No products in the cart.
कलेच्या माध्यमातून सामाजिक प्रश्नांवर संवाद
काउंन्सिल ऑफ आर्ट्स अॅण्ड सोशल प्रॅक्टीस (कॅस्प) या संस्थेच्या वतीने शिस्तबद्ध कलात्मक संशोधन आणि सांस्कृतिक शाश्वततेवर सुलभ संवाद व्हावा यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात येते. यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते. या उपक्रमांचाच एक भाग म्हणून उद्या पब्लिक इंटरव्हेन्शन आर्टीस्ट म्हणून प्रसिद्ध असलेल्या दिल्लीस्थित स्मिता उर्मिला राजमाने यांच्याशी झूम मिटींग आणि CASP चे Facebook Page याद्वारे थेट संवाद साधला जाणार आहे. जात आणि लिंग आधारित भेदभाव आणि अत्याचाराच्या समस्यांना कलेच्या प्रात्यक्षिक स्वरूपाद्वारे आणि अभिलेखांच्या उभारणीद्वारे कशारितीने सामोरे जाता येऊ शकते हे ती स्वतः अवलंबत असलेल्या उपक्रमांद्वारे मांडणार आहे.
सध्याच्या काळात समकालिन कला अभिव्यक्तींमध्ये सार्वजनीक हस्तक्षेप आणि सहभागी राजकीय कलांच्या उदयोन्मुख पद्धती यांबाबत जाणून घेण्यासाठी या संवाद सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. स्मिता उर्मिला राजमाने या चित्रकर्तीचा लहानश्या गावातून महानगराकडे झालेला प्रवास आणि स्टुडीओ आणि आर्ट गॅलरी यांच्या पल्याड जाऊन समाजामधील समस्यांची सोडवणूक करण्यासाठी कलेचा अवलंब करण्याची आत्यंतिक निकड ओळखून त्यांनी हाती घेतलेले उपक्रम यांबाबत जाणून घेणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
या ऑनलाईन लाइव्ह संवाद सत्रामध्ये स्मिता उर्मिला राजमाने ‘बॅटल ऑफ रामराज्य’ या बुद्धीबळावर आधारित सार्वजनीक खेळ याबाबत बोलणार आहेत तसेच ‘स्मॅश द ब्राह्मनिकल पेट्रीयारकी’ जातीविषयक प्रश्नांवर भाष्य करणाऱ्या लोकसहभागात्मक उपक्रमाबाबत बोलणार आहेत.
त्याचबरोबर या कार्यक्रमात त्या ‘आंबेडकर एज डिजिटल बुक मोबाईल’ या सार्वजनीक कलात्मक उपक्रमाबाबतही माहिती देतील.
स्मिता उर्मिला राजमाने यांनी भारतीय कला महाविद्यालय, पुणे येथून चित्रकारीतेचा डिप्लोमा पूर्ण केला आहे. सध्या त्या सामाजित प्रश्नांबाबत जनजागृती करण्यासाठी चित्रकलेचा वापर करून विविध उपक्रम राबवत आहेत.
या कार्यक्रमामाध्ये सहभागी होण्यासाठी पुढील लिंक्स वापरा. या कार्यक्रमात स्मिता राजमाने यांच्या सोबत दिल्लीस्थित लेखिका आणि कला समीक्षक नूपुर देसाई संवाद साधतील.
Join Zoom Meeting
https://us02web.zoom.us/j/85628211904?pwd=Z0RnT1hvQWpxT3pnL3FRY1NSTndBdz09
Meeting ID: 856 2821 1904
Passcode: 891422
CASP Facebook page
Related
Please login to join discussion