No products in the cart.
उत्तर प्रदेश पर्यटन विभागातर्फे लोगो स्पर्धा
या स्पर्धेचे दोन भाग असून पहिली स्पर्धा ही पर्यटन विभागाच्या लोगो रिडिझाइनसंबंधी आहे. आहे तर दुसरी स्पर्धा ही टॅगलाईन तयार करण्यासंबंधी आहे. स्पर्धेच्या विजेत्याला लोगो डिझाईनसाठी एक लाख रुपयांचे पारितोषिक जाहीर करण्यात आले आहे तर टॅगलाईन स्पर्धेच्या विजेत्याला पन्नास हजाराचे पारितोषिक देण्यात येईल.
स्पर्धेचे नियम :१. लोगो तसेच टॅगलाईन सरल आणि आकर्षक असावी.
२. प्रभावी आणि लक्षात राहील अशी रचना असावी.
३. लोगो हा लवचिक आणि आकाराने लहान मोठा करता येणारा हवा.
लोगो डिझाईन हे दोन प्रकारात जमा करावे. एक डिझाईन सिंगल कलर असावे तर दुसरा विकल्प हा रंगीत असावा. स्पर्धेची अंतिम तारीख 20 मे 2023 असून त्या दिवशी संध्याकाळी चार पर्यंत डिझाईन आणि टॅगलाईन संबंधित खात्याच्या कार्यालयात जमा करणे आवश्यक आहे.
अधिक माहितीसाठी खालील जाहिरात पाहावी किंवा https://www.uptourism.gov.in/en या वेबसाईटला भेट द्यावी.
Related
Please login to join discussion