News

एनजीएमएत लुईस कान  !

लुईस कान या अमेरिकेतल्या प्रख्यात आर्किटेक्टनी बांगलादेशच्या संसद भवनाचं डिझाईन केलं होतं. आधुनिक तरीही लोकशाहीच्या मूल्यांना ठामपणे दर्शवणारी ही वास्तू लुईस कान यांच्या प्रभावशाली कामामध्ये समाविष्ट होते. या वास्तूचं डिझाईन कसं झालं, लुईस यांनी या वास्तूला प्रत्यक्षात कसं आणलं याची माहिती देणारा माहितीपट म्हणजे ‘लुईस कान्स टायगर सिटी’. या माहितीपटाचं दिग्दर्शन सुंदरम टागोर यांनी केलं आहे.

या माहितीपटाच्या शोचं आयोजन मुंबईतल्या एनजीएमएच्या सभागृहात दि ०६ एप्रिल २०२३ रोजी सायंकाळी ०६:३० वाजता करण्यात आलं आहे. या शो नंतर आर्किटेक्ट नंदिनी सोमय्या संपत या सुंदरम टागोर यांच्याशी संवाद साधतील.

या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी प्रेक्षकांनी www.insider.in या वेबसाईटवर पूर्व नोंदणी करणे आवश्यक आहे याची कृपया नोंद घ्यावी. अधिक माहितीसाठी निमंत्रण पत्रिका पाहावी.

I am text block. Click edit button to change this text. Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Ut elit tellus, luctus nec ullamcorper mattis, pulvinar dapibus leo.

Related Posts

1 of 83

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.