No products in the cart.
‘एनजीएमए’त ‘महाराजाचा खजिना’
मुंबईच्या नेशनल गॅलरी ऑफ मॉर्डन आर्टमध्ये एअर इंडियाच्या संग्रहात असलेल्या मौल्यवान कलाकृतींचं ‘महाराजा ट्रेजर’ हे प्रदर्शन आयोजित करण्यात आलं आहे. या प्रदर्शनाचं उदघाटन दि 27 एप्रिल 2023 रोजी केंद्रीय सांस्कृतिक मंत्री जी किशन रेड्डी यांच्या हस्ते होणार आहे. या प्रदर्शनात व्ही. एस. गायतोंडे, एम.एफ. हुसेन, के एच आरा, एस. एच रझा, जानकीराम, अर्पणा कौर, बी. प्रभा, एन एस बेंद्रे, जी.आर. संतोष, राघव कनेरिया या दिग्गज भारतीय कलावंतांच्या कलाकृती रसिकांना पाहता येतील.
प्रख्यात चित्रकार साल्वादोर दाली यांनी एअर इंडियासाठी तयार केलेला ऍश ट्रे देखील या प्रदर्शनात पाहण्यासाठी उपलब्ध असेल. साल्वादोर दाली यांनी एअर इंडियासाठी जेव्हा हा ऍश ट्रे तयार केला होता, तेव्हा त्यांनी यासाठी आगळंवेगळं मानधन मागितलं होतं. ते म्हणजे मोबदला म्हणून त्यांना पैशांऐवजी एक खराखुरा हत्ती हवा होता ! आणि एअर इंडियाने देखील दाली यांची ही अजब मागणी पूर्ण देखील केली होती. त्यासाठी एअर इंडियानं चक्क एक माहूत हत्तीसोबत स्पेनला पाठवला होता.

जानेवारी 2023 मध्ये झालेल्या एका सामंजस्य करारानुसार एअर इंडिया आता आपला हा अत्यंत मौल्यवान कलाकृतींचा संग्रह एनजीएमए, दिल्लीला हस्तांतरित करणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून हे प्रदर्शन मुंबईच्या एनजीएमएमध्ये आयोजित करण्यात आलं आहे. खरं तर एअर इंडियानं त्या काळात आपल्या कलासंग्रहात अनेक नवोदित भारतीय कलावंतांच्या कलाकृती संग्रहित केल्या होत्या तेच कलावंत आता नावलौकिकास आले आहेत. तेव्हा काही हजारात विकत घेतलेल्या या कलाकृतींना आता लाख मोलाचाच नव्हे तर कोट्यवधी रुपयांचा भाव आला आहे.
कला अभ्यासक आणि रसिकांनी चुकवू नये असे हे प्रदर्शन आहे.
हे प्रदर्शन दि 27 एप्रिल ते 02 जुलै 2023 दरम्यान प्रेक्षकांसाठी खुले असेल.
*****
Related
Please login to join discussion