News

वाईरकरांच्या शब्दांत ‘बाळासाहेब’

व्यंगचित्रकार प्रभाकर वाईरकर यांना बाळासाहेबांचा स्नेह लाभला. बाळासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली वाईरकरांनी सामना तसेच मार्मिक अंकाच्या व्यंगचित्र विभागाची धुरा सांभाळली. बाळासाहेब स्वत: श्रेष्ठ व्यंगचित्रकार होते. त्यांच्या सहवासातील आठवणी या लेखात वाचायला मिळतील. बाळासाहेबांचे अनेक माहित नसलेले किस्सेही या लेखात आहेत. बाळासाहेबांचं व्यंगचित्र कलेमधील प्रभुत्व, व्यंगचित्र करण्यामागील विचार याबद्दल वाईरकरांनी लिहिले आहे. त्याचबरोबर सर्वसामान्य व्यक्तींचीही बाळासाहेब मायेने विचारपूस करत असत याबद्दल लिहिले आहे.

डेव्हिड लो हा बाळासाहेबांचा आवडता व्यंगचित्रकार. त्यांच्याविषयीची या लेखात माहिती मिळते. कुठलाही मजकूर छापायला जाण्याआधी बाळासाहेब तो स्वतः तपासून घेत. यामुळेच सामना, मार्मिक या प्रकाशनांना जनमानसात स्थान मिळाले. मार्मिकची सुरुवात कशी झाली याबद्दलही या लेखात माहिती आहे.

बाळासाहेब जसे कुशल राजकारणी तसेच कुशल व्यंगचित्रकार. त्यामुळे त्यांची लंडनमध्ये प्रकाशित होणाऱ्या विन्स्टन चर्चिल चरित्रासाठी व्यंगचित्र करण्यासाठी निवड झाली. या पुस्तकात जगभरातील मातब्बर व्यंगचित्रकारांची व्यंगचित्रे प्रकाशित होणार होती. भारतातून निवड झालेले बाळासाहेब हे एकमेव व्यंगचित्रकार होते. प्रसिद्ध व्यंगचित्रकार आर. के. लक्ष्मण यांच्या स्वभावाच्या काहीशी नकारात्मक आठवणही या लेखात आहे. बाळासाहेबांबद्दल लक्ष्मण यांना काहीशी व्यावसायिक असूया होती याचा उल्लेख या लेखात आहे.

एकूण बाळासाहेबांचा राजकीय प्रवास, मार्मिकची स्थापना, बाळासाहेबांची काम करण्याची शैली, व्यंगचित्रकार आणि माणूस म्हणून त्यांचं मोठेपण याबद्दल या लेखात खूप काही वाचावयास मिळू शकेल .

मार्मिक दिवाळी अंक २०२२
किंमत : १०० रु

*****

‘चिन्ह’ चे अपडेट्स मिळवण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करून व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
https://chat.whatsapp.com/C8eaBiY2CjEIqxFvJWmnUD

‘चिन्ह’ चे फेसबुक पेज लाईक करा
https://www.facebook.com/chinha.art

‘चिन्ह’चे टेलिग्राम चॅनल खालील लिंकवर क्लिक करून जॉईन करा
https://t.me/ChinhaMag

Related Posts

1 of 83

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.