No products in the cart.
स्मरण अविनाश गोडबोले यांचं…
दैनिक लोकसत्ताच्या लोकरंग पुरवणीत दर पंधरवड्यानं प्रसिद्ध होणारं सदर म्हणजे कलास्वाद. जे जे इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाइड आर्टचे माजी अधिष्ठाता मंगेश राजाध्यक्ष यांनी २२ मे च्या अंकात आपले इलस्ट्रेटर मित्र अण्णा उर्फ अविनाश गोडबोले यांच्यावर लिहिलं आहे, ज्यात त्यांनी विद्यार्थी दशेपासूनच्या आठवणी लिहिल्या आहेत. दुर्धर आजारामुळं उजव्या हातानं त्यांना इलस्ट्रेशन, ऍडव्हर्टायझींगची काम करता येईनाशी झाली. पण त्यावरही मात करून गोडबोले यांनी डाव्या हातानं पेंटिंग करायला कशी सुरुवात केली याचं अतिशय हृद्य चित्रण राजाध्यक्ष यांनी या लेखात केलं आहे. हा लेख अनेक कलावंतांना प्रेरणादायक ठरू शकेल म्हणून ही नोंद !
राजाध्यक्ष यांचा मूळ लेख वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा
https://epaper.loksatta.com/3482405/loksatta-mumbai/22-05-2022#page/21/2
Related
Please login to join discussion