No products in the cart.
HBCSE तर्फे म्युरल स्पर्धा
टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्चच्या होमी भाभा सेंटर फॉर सायन्स एज्युकेशन (HBCSE) नं आपल्या 50 व्या वर्धापन दिनानिमित्त म्युरल पेंटिंग स्पर्धेचं आयोजन केलं आहे. कला आणि शिल्पकलेमध्ये रस असलेले कलाकार या स्पर्धेत भाग घेऊ शकतात. इच्छुक स्पर्धकांनी आपल्या प्रवेशिका bhavya@hbcse.tifr.res.in या मेल आयडीवर पाठवाव्या.
प्रवेशिका आल्यानंतर निवडक कलाकारांना त्यांच्या कलाकृतींच्या स्केल्ड – डाउन प्रतिकृती अंतिम मूल्यमापनासाठी पाठवण्याचे आवाहन HBCSE द्वारे केले जाईल. या स्पर्धेसाठी म्युरलचा आकार 10 फूट उंची आणि 9 फूट रुंदी एवढा आहे. तीन कलाकारांची निवड या स्पर्धेमधून करण्यात येईल. निवडलेल्या प्रत्येक कलाकाराला त्यांच्या योगदानासाठी INR 25,000 चे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.
HBCSE ही संस्था आपला 50 वा वर्धापन दिन साजरा करत असताना, ही भित्तिचित्र स्पर्धा कला, सर्जनशीलता आणि वैज्ञानिक शिक्षण यांना महत्व देणारी ठरणार आहे. त्यामुळे अधिकाधिक कलाकारांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे असे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे.
Related
Please login to join discussion