No products in the cart.
नागेश हाटकर यांचे निधन
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नागेश हाटकर यांचे सफाळे येथे वार्धक्याने मंगळवारी (ता. ४) सकाळी निधन झाले. बाबा आमटे यांनी सुरू केलेल्या कृष्ठरोगी व आदिवासी बांधवांसासाठी केलेल्या कार्यात हाटकर यांनीदेखील सहभाग घेतला होता. नागेश हाटकर यांनी १९५८ मध्ये जेजे स्कूल ऑफ आर्ट येथून सुवर्णपदक मिळवत पदवी प्राप्त केली. मुंबई येथे त्यांनी फोटोग्राफीचा व्यवसायदेखील केला. उत्कृष्ट छायाचित्रकार म्हणून त्यांची ख्याती होती. १९७० मध्ये तत्कालीन ठाणे जिल्ह्यात आदिवासींच्या प्रश्नासाठी काळूराम धोदडे यांच्या भूमी सेना या आदिवासींसाठी काम करणाऱ्या संघटनेबरोबर त्यांनी काम केले. मेधा पाटकर यांच्या नर्मदा बचाओ आंदोलनातही हाटकर सहभागी होते.
ज्येष्ठ समाजसेवक आणि कार्यकर्ते विजय तांबे हे हाटकरांचे सहकारी होते. चळवळीत त्यांनी एकत्र काम केलं होतं. नागेश हाटकरांबद्दल माहिती सांगताना तांबे म्हणाले की, “हाटकरांनी चळवळीत कायम आमच्या पालकत्वाची भूमिका प्रेमाने निभावली. त्यांनी आमच्या पिढीवर अतोनात प्रेम केले. खरे तर त्यांचा स्वभावच ओसंडून प्रेम करण्याचा होता. वैचारिक दृष्ट्या ते आपल्या मतांवर ठाम असत. आपला मुद्दा व्यवस्थितपणे पटवून देण्याची त्यांची हातोटी विलक्षण होती.”
चिन्ह आर्ट न्यूज परिवारातर्फे नागेश हाटकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
Related
Please login to join discussion