News

‘कसोटी विवेकाची’ प्रदर्शन

डाॅ. नरेंद्र दाभोलकर यांची १ नोव्हेंबर २०२२ ला ७७ वी जयंती आहे. सध्या ‘दाभोलकर खून खटला’ एवढ्यापुरतचं दाभोलकरांविषयीचं मुख्य माध्यमांमधील कव्हरेज मर्यादित आहे. डाॅ. नरेंद्र दाभोलकर यांच्यापाठोपाठ गोविंद पानसरे, एम एम कलबुर्गी, गौरी लंकेश यांच्याही हत्या झाल्या.

दाभोलकरांविषयीच बोलायचं तर त्यांच्या मृत्यूनंतरही अनेक गैरसमज पसरवले जात आहेत. ते दूर व्हावेत, दाभोलकर व्यक्ती, कार्य आणि विचार लोकांपर्यंत विशेषत: तरुणांपर्यंत पोहोचावेत यासाठी दाभोळकरांचे अनुयायी एक नवीन उपक्रम घेवून येत आहेत.  ‘कसोटी विवेकाची’ या प्रदर्शनात जेजे स्कूल ऑफ आर्टचे विद्यार्थी आपली अभिव्यक्ती वेगवेगळ्या माध्यमातून सादर करणार आहेत.

प्रसिद्ध अभिनेते नसिरूद्दीन शहा यांच्या हस्ते यशवंतराव चव्हाण सेंटर येथे २८ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता या प्रदर्शनाचं उद्घाटन होणार आहे. डॉ दाभोलकर यांच्या पत्नी डाॅ. शैला दाभोलकर आणि जेजे स्कूल ऑफ आर्टचे अधिष्ठाता आणि महाराष्ट्राचे प्रभारी कला संचालक प्रा. विश्वनाथ साबळे हे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे असणार आहेत.
२८ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर सकाळी १० ते रात्री ९ वाजेपर्यंत हे कलाप्रदर्शन सर्वांसाठी खुले असेल.

पत्ता – यशवंतराव चव्हाण सेंटर, जनरल जगन्नाथ भोसले मार्ग, मंत्रालयाच्या समोर, सचिवालय जिमखानाशेजारी. नरिमन पाॅईंट – ४०००२१.

*****

‘चिन्ह’ चे अपडेट्स मिळवण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करून व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
https://chat.whatsapp.com/C8eaBiY2CjEIqxFvJWmnUD

‘चिन्ह’ चे फेसबुक पेज लाईक करा
https://www.facebook.com/chinha.art

‘चिन्ह’चे टेलिग्राम चॅनल खालील लिंकवर क्लिक करून जॉईन करा
https://t.me/ChinhaMag

Related Posts

1 of 83

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.