No products in the cart.
नाशकात ‘रंगोत्सव’ प्रत्यक्ष निसर्ग चित्रण स्पर्धा
नाशिक २२ नोव्हेंबर
नाशिकच्या कलाजगतात निसर्ग चित्रकार शिवाजी तुपे याना अनन्य स्थान होतं. नाशकातल्याच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातल्या ज्येष्ठ आणि तरुण चित्रकारांशी त्यांचे अतिशय जिव्हाळ्याचे संबंध होते. नाशकात तर त्यांनी आपलं एक वेगळंच स्थान निर्माण केलं होतं. त्यामुळेच की काय त्यांना जाऊन आता जवळजवळ एक दशक लोटलं तरी त्यांच्या स्मृतिदिनानिमित्तानं नाशकात अगदी नेमानं कार्यक्रम आयोजित केले जातात. एखाद्या चित्रकाराच्या स्मृतीप्रित्यर्थ अशा प्रकारच्या मोठया स्पर्धेचं आयोजन करणं ही निश्चितपणे अत्यंत दुर्मिळ गोष्ट आहे. म्हणूनच नेमानं दरवर्षी या स्पर्धेचं आयोजन करणाऱ्या आयोजकांचं अभिनंदन करावयास हवं. व्यावसायिक आणि विद्यार्थी चित्रकारांसाठी आयोजित केली जाणारी ‘रंगोत्सव’ ही प्रत्यक्ष निसर्गचित्रण स्पर्धा ही चित्रकला वर्तुळात एक महत्वाची स्पर्धा मानली जाते. यंदा या स्पर्धेचं दहावं वर्ष आहे.
दरवर्षीप्रमाणेच यंदाही सदर स्पर्धा रविवार दि १० डिसेंबर २०२३ रोजी नाशिक येथेच सोनारवाडा, सोमवार पेठ येथे घेण्यात येणार आहे. व्यावसायिक चित्रकारांसाठी अनुक्रमे दहा, सात आणि पाच हजारांची तर विद्यार्थी चित्रकारांसाठी अनुक्रमे सात, पाच, तीन आणि उत्तेजनार्थ रुपये एक हजारांची दोन पारितोषिके दिली जाणार आहेत. दि. १० रोजी सकाळच्या सत्रात ही स्पर्धा होणार आहे तर पारितोषिक वितरण समारंभ दुपारच्या सत्रात आयोजित करण्यात आला आहे.
स्पर्धेचे नियम आणि बक्षिसे याबद्दलची माहिती सोबत दिलेल्या फोटोमध्ये दिली आहे.
अधिक माहितीसाठी मुक्ता बालिगा (९८२२९२३१४४), अशोक ढिवरे (९८५०८६९६७०), किरण पाटील (९४२२२५३७७४), वैशाली अभ्यंकर (९७६४९२३४३९) यांच्याशी संपर्क साधावा.
Related
Please login to join discussion