No products in the cart.
नाशिक ‘ चित्रचोरी ‘ अपडेटस
नाशिक कला निकेतन मधून जी चित्रे चोरीला गेली आणि त्यांचं प्रदर्शन जहांगीर आर्ट गॅलरीत करण्यात आलं, या संदर्भातली सविस्तर स्टोरी आम्ही २५ ऑगस्टलाच केली होती. या स्टोरीची सर्वच वृत्तपत्रांनी दुसऱ्या दिवशी दखल घेतली आणि हे प्रकरण सगळ्यांनीच लावून धरले. खरं तर मुख्य प्रवाहातील माध्यमे चित्रकला या विषयाला नेहमीच कुठेतरी कोपऱ्यात स्थान देतात, पण या स्टोरीला त्यांनी मुख्य पानांवर जागा दिली याबद्दल त्यांचे धन्यवाद.
नाशिक कला निकेतन संस्थेच्या संचालकांनी विद्यार्थ्यांना त्यांची चित्रे परत देण्याचे ठरवले आहे हे आम्ही आमचे अर्धे यश मानतो. आता जेव्हा सर्वच स्पर्धा आयोजक स्पर्धेतील चित्रे आपल्या ताब्यात ठेवण्याचा नियम रद्द करतील तेव्हच ते आमचे संपूर्ण यश असेल. आम्ही चालवलेल्या या मोहिमेला सर्वच कलाकार आणि कलेच्या चाहत्यांनी भरपूर प्रतिसाद आणि पाठींबा दिला त्याबद्दल त्यांचे आभार. आमची ही स्टोरी खूप गाजली, एवढी की सेवानिवृत्त सैन्य अधिकाऱ्यांपासून रिक्षाचालकांपर्यंत सर्वानीच आम्हाला पाठिंबा दिला!
या मंगळवारी (दि. ३१ ऑगस्ट ) कला निकेतन महाविद्यालयांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आहे. त्यामध्ये या प्रकरणी निर्णय घेण्यात येणार आहे असे कळते त्याची माहिती आम्ही देऊच.पण या विषयावर सर्वच माध्यमांनी काय काय बातम्या दिल्या याची लिंक आम्ही इथे देत आहोत.
हिंदुस्थान टाइम्स :
महाराष्ट्र टाइम्स :
सकाळ स्टोरी:
लोकमत :
http://epaper.lokmat.com/articlepage.php?articleid=LOK_HNSK_20220828_8_7
Related
Please login to join discussion