No products in the cart.
साबळे यांची उचलबांगडी !
दि २९ डिसेंबर २०२२ रोजी शासकीय अध्यादेशानुसार कला संचालक आणि जेजे स्कूल ऑफ आर्टचे डीन प्रा. विश्वनाथ साबळे यांना महाराष्ट्र राज्याच्या कला संचालक पदावरून पदमुक्त करण्यात आले आहे. त्यांच्या जागी जेजे कॉलेज ऑफ आर्किटेक्चरचे प्राचार्य प्रा. राजीव मिश्रा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही नवीन नियुक्ती एक वर्षाच्या कालावधीसाठी असणार आहे. वाचकांसाठी शासकीय जी. आर. येथे देत आहोत. या जी. आर. नुसार मिश्रा यांनी आपली आर्किटेक्चर कॉलेजची जबाबदारी सांभाळून कला संचालक पद सांभाळायचे आहे. साबळे यांच्या नियुक्तीपूर्वी राजीव मिश्रा हे पद सांभाळत होते. पण उदय सामंत यांच्या कार्यकाळात राजीव मिश्रा यांना तडकाफडकी हटवण्यात आले आणि साबळे यांची या पदावर नियुक्ती करण्यात आली होती.
‘चिन्ह’ने सतत पाठपुरावा करून साबळे यांचा गैरव्यवहार चव्हाटयावर आणला आहे. त्यामुळे या बातम्यांमुळेच साबळे यांच्यावर ही कार्यवाही झाली असावी अशी चर्चा कला वर्तुळात सुरु आहे.
(फिचर इमेजमधील फोटो हा जुना आहे. या फोटोमध्ये प्रा. राजीव मिश्रा प्रा. साबळे यांचे नवीन कला संचालक म्हणून स्वागत करत आहेत. उद्या हा फोटो उलटा होणार !)
****
Related
Please login to join discussion