No products in the cart.
उच्च शिक्षण मंत्र्यांची आणखी एक सणसणीत चपराक!
विद्यमान उच्च व तंत्र शिक्षणमंत्री यांनी जेजे आणि महाराष्ट्राच्या कला शिक्षणाच्या हितासाठी अनेक चांगले निर्णय घेण्याचा धडाकाच लावला आहे. त्यामध्ये काल कला संचालकपदी राजीव मिश्रा यांची निवड केली आहेच. आजची चांगली बातमी म्हणजे जेजे स्कूल ऑफ आर्टला राज्यस्तरीय कला विद्यापीठ बनवण्यासाठी मागील सरकारच्या कार्यकाळात जी अभ्यास समिती तयार करण्यात आली होती ती, दि २६ डिसेंबरच्या शासकीय अध्यादेशानुसार रद्द करण्यात आली आहे. उदय सामंत हे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री असताना अनेक नाट्यमय घटना घडल्या. जेजेला डिनोव्हो विद्यापीठ करण्याच्या हालचाली सुरु असताना अचानक राज्यस्तरीय विद्यापीठ बनवण्यासाठी दि २१ मार्च २०२२ रोजी अभ्यास समिती तयार करण्यात आली. त्यानंतर नवीन सरकारने निपुण विनायक यांच्या नेतृत्वाखाली जेजेला डिनोव्हो दर्जा देण्यासाठी वेगाने कामकाज सुरु केले. केंद्र शासनानेही जेजेला डिनोव्हा दर्जा देण्यासाठी इरादा पत्र दिले असल्याने या राज्यस्तरीय कला विद्यापीठ अभ्यास समितीची आवश्यकता संपली होती. त्यामुळेच या नवीन निर्णयाअंतर्गत ही अभ्यास समिती रद्द करण्यात आली आहे.
ही समिती रद्द होणे हे जेजे डिनोव्हो प्रक्रियेतील आणखी एक यश म्हणता येईल. या समितीच्या रद्द होण्याने जेजेला राज्यस्तरीय कला विद्यापीठ बनवणाऱ्यांच्या सर्वच शक्यता मावळल्या आहेत. महाकॅटना संघटना जेजेला राज्यस्तरीय कला विद्यापीठ बनवण्यासाठी विशेष प्रयत्न करत होती. प्रसंगी या संघटनेची न्यायालयात जायचीही तयारी होती. पण प्रस्तुत निर्णयामुळे संघटनेच्या या प्रयत्नांना आता काही अर्थ उरलेला नाही.
*****
Related
Please login to join discussion