No products in the cart.
- Home
- Uncategorized
- उच्च शिक्षण खात्यातर्फे मिटिंग नाही, बहिष्कार सुरूच …
उच्च शिक्षण खात्यातर्फे मिटिंग नाही, बहिष्कार सुरूच …
काल दि ०३ मार्च २०२३ रोजी उच्च शिक्षण खात्यातर्फे विना अनुदानित महाविद्यालयांचा उच्च कला परीक्षांवर जो बहिष्कार घातला गेला होता त्यासंदर्भात मिटिंग आयोजित करण्यात आली होती . सूत्रांकडून माहिती घेतली असता अशी कुठलीही मिटिंग आयोजित करण्यात आली नव्हती असे कळते. त्यामुळे महाविद्यालयांचा बहिष्कार सुरूच आहे. विद्यार्थीही या बहिष्कारामध्ये सामील झाले आहेत.
शासनाने विद्यार्थ्यांना परीक्षा देण्याची सोय उपलब्ध करून दिली असतानाही विद्यार्थी या परीक्षेला बसले नाही याचे कारण कळत नाही. या बहिष्काराला नैतिक पाठिंबा देऊन विद्यार्थी आपली परीक्षा देऊ शकले असते. जेणेकरून त्यांचं वर्ष वाया गेलं नसतं. कुठल्याही कॉलेजचं अनुदान हा पूर्णपणे कॉलेजचं व्यवस्थापन आणि शासन या दोहोंतील विषय असतो. शिक्षक यात कुठेही सहभागी नसतात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी परीक्षा देणे गरजेचे होते.
आता उच्च कला प्रशिक्षणाचं भवितव्य ठरवणाऱ्या या परीक्षांच्या बहिष्कारासंदर्भात पुढे काय होणार या प्रतीक्षेत कला वर्तुळ आहे.
****
Related
Please login to join discussion