No products in the cart.
‘आर्ट म्युज’ कार्यशाळा
आजकाल इंटरनेट, चित्रपट आणि ओटीटी वरील वेब सिरीज मधून रोज इच्छा असो वा नसो मानवी देहाची नग्नता प्रचंड प्रमाणात आपल्यावर आदळतेय. आणि ती सहजपणे किंवा मिटक्या मारत स्वीकारणारे तथाकथित संस्कृती रक्षक चित्रकलेसारख्या प्राचीन आणि अभिजात माध्यमातून होणाऱ्या नग्नतेच्या चित्रणाला मात्र कठोर आक्षेप घेतात हा विरोधाभास आज एकविसावं शतक उजाडलं तरी कायम आहेच.
समाजाच्या या अतार्किक आणि अतिरेकी भूमिकेमुळे इतकी वर्ष उलटूनही न्यूड स्टडी साठी सुडौल बांधा असणारी मॉडेल्स मिळणं जवळजवळ अशक्य आहे. किंबहुना उपलब्ध असणाऱ्या वयस्कर मॉडेलकडे बघण्याचा दृष्टिकोनही पार गढूळलेलाच आहे. अत्यंत पांचट आणि अश्लील विनोद असणारे चित्रपट डोक्यावर घेणाऱ्या लोकांनी न्यूड मॉडेलच्या जीवनावरच्या रवी जाधवच्या अभिजात चित्रपटाला निव्वळ ‘न्यूड’ या नावामुळे टोकाचा विरोध केला.
वास्तविक पाहता न्यूड पेंटिंग हा चित्रकाराच्या दृष्टीने अतिशय वेगळा विषय. त्यात अश्लीलता, अनैतिकता, व्याभिचार किंवा अवांछित स्पर्शाचा लवलेशही नसतो असतो तो केवळ त्याच्या चित्रकलेचा शुद्ध आविष्कार. ही शुद्धता आणि कलाकाराचा मनस्वीपणा समजून घेऊन तितक्याच मनस्वीपणे न्यूड मॉडेल होणं हे स्वेच्छेने स्वीकारलेली आणि स्वतःला ‘आर्ट म्युज’ म्हणवून घेणारी तरुणी म्हणजे लिलियन डिसूजा. न्यूड स्टडी बाबत तितकाच संवेदनशील असणारा चित्रकार म्हणजे विक्रांत शितोळे. या दोघांनी एकत्र येऊन ‘द आर्ट म्युज’ या लाईव्ह न्यूड पेंटिंग कार्यशाळेचे आयोजन केले आहे. या कार्यशाळेत विक्रांत शितोळे प्रत्यक्षिक देणार आहेत आणि सहभागी चित्रकारांना देखील लाईव्ह न्यूड मॉडेल स्टडी करता येईल.
सुस्वरूप आणि सुडौल बांध्याच्या तरुण मॉडेल्स न्यूड स्टडी साठी मिळणं तसं दुरापास्तच. त्यामुळे न्यूड स्टडी साठी उत्सुक असणाऱ्या चित्रकारांसाठी हि तशी दुर्मिळ संधीच. त्यामुळे चित्रकारांनी या कार्यशाळेत आवर्जून सहभागी व्हावे असे आवाहन चित्रकार विक्रांत शितोळे यांनी केले आहे.
या कार्यशाळेच्या अधिक माहितीसाठी ९१३७५ ३७७६३ या क्रमांकावर संपर्क साधावा.
‘चिन्ह’चे अपडेट्स मिळवण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करून व्हाट्सएप ग्रुप जॉईन करा
https://chat.whatsapp.com/IgdCKjB4vEsGVz68ljV34n
‘चिन्ह’चे फेसबुक पेज लाईक करा
https://www.facebook.com/chinha.art
Related
Please login to join discussion