No products in the cart.
‘अनावृत’ न्यूड पेंटिंग कार्यशाळा आणि स्पर्धा
एमआयटी फाईन आर्ट आणि अप्लाइड आर्ट कॉलेज, पुणे तर्फे फक्त विद्यार्थ्यांसाठी ‘अनावृत’ न्यूड पेंटिंग कार्यशाळेचे दि १० ऑक्टोबर रोजी आयोजन करण्यात आले आहे. ही कार्यशाळा ५ दिवसांची असून चित्रकार अक्षय पै विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिकासहित मार्गदर्शन करणार आहेत. कार्यशाळेचे शुल्क ३००० रुपये असून या शुल्कामध्ये स्टुडिओची जागा, जेवण आणि राहण्याची व्यवस्था केली जाईल. ज्या विद्यार्थ्यांना स्वतःचे आर्ट मटेरियल आणणे शक्य नसेल त्यांच्यासाठी कार्यशाळेच्या जागी सशुल्क आर्ट मटेरियल उपलब्ध करून दिले जाईल. स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी उत्कृष्ट कलाकृतीला बक्षीस दिले जाईल.
ही कार्यशाळा फक्त विद्यार्थ्यांसाठी असून कार्यशाळेचे गांभीर्य विद्यार्थ्यांनी जपणे आवश्यक आहे. कार्यशाळेच्या नियमांबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी व नाव नोंदणीसाठी खालील लिंकवर क्लीक करून गुगल फॉर्म भरावा.
https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSeA4JajuOonsqb-EtY4MMCZyvfKijDa0w9pkPohj1-FUI_HNw/viewform
कार्यशाळेसाठी रजिस्ट्रेशन करण्याची अंतिम तारीख ३० सप्टेंअबर २०२२ आहे. अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी 9527240870 \ 9340225905 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन विद्यार्थी प्रतिनिधी गौरी कुलकर्णी यांनी केले आहे.
कार्यशाळेचा पत्ता :
एमआयटी कॉलेज ऑफ फाईन अँड अप्लाइड आर्टस्, एमआयटी एडीटी युनिव्हर्सिटी,लोणी काळभोर, पुणे.
****
‘चिन्ह’चे अपडेट्स मिळवण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करून व्हाट्सएप ग्रुप जॉईन करा
https://chat.whatsapp.com/IgdCKjB4vEsGVz68ljV34n
‘चिन्ह’चे फेसबुक पेज लाईक करा
https://www.facebook.com/chinha.art
Related
Please login to join discussion