No products in the cart.
सीईटी परीक्षार्थींसाठी जुन्या प्रश्नपत्रिका !
महाराष्ट्र कला संचालनालय आणि सीईटी सेल यांच्यातर्फे घेण्यात येणाऱ्या सीईटी परीक्षेची नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाली आहे. कालच ही तारीख २४ मार्च पर्यंत वाढवण्यात अली आहे. काही वर्ष सीईटीच्या वेबसाईटवर मुलांना परीक्षेच्या तयारीसाठी मार्गदर्शन व्हावे म्हणून जुन्या प्रश्नपत्रिका अपलोड करण्यात येत होत्या. सध्या तरी सीईटी सेल त्या वेबसाईटवर उपलब्ध करत नाहीये. यावर्षी करेल की नाही याची काही माहिती नाही. यंदा सीईटी सेलने एक मोठा बदल केला आहे असे समजते. यावर्षी B.Des अर्थात बॅचलर ऑफ डिझाईन या कोर्सच्या प्रवेशासाठी वेगळी प्रश्नपत्रिका असणार आहे असे कळते. लवकरच यासंदर्भात आम्ही अधिक माहिती देण्याचा प्रयत्न करू.
‘चिन्ह’चे वाचक आणि बीएफएचे विद्यार्थी शाम बराई यांनी त्यांच्याकडे संग्रही असलेल्या जुन्या प्रश्नपत्रिका ‘चिन्ह’चे वाचक आणि सीईटी परीक्षार्थी यांच्यासाठी उपलब्ध करून दिल्या आहेत. ज्या विद्यार्थ्यांना या प्रश्नपत्रिका हव्या असतील यांनी ‘चिन्ह’चा व्हाट्सअप ग्रुप खालील लिंकवर क्लिक करून जॉईन करावा. हा ग्रुप ‘ऍडमिन ओन्ली’ असल्याने तो एकतर्फी आहे याची नोंद घ्यावी.
‘चिन्ह’च्या व्हाट्सअप ग्रुपची लिंक :
https://chat.whatsapp.com/KsGTWYH3K1YF2YZe8AADN2
शाम बराई हे सीईटी परीक्षेचे जाणकार आहेत. अनेक विद्यार्थ्यांना ते या विषयावर मार्गदर्शन करत असतात. लवकरच ‘चिन्ह’च्या यु ट्यूब चॅनलवर सीईटी परीक्षेच्या तयारीसंदर्भात शाम यांच्याबरोबर एक व्हिडीओ आम्ही करणार आहोत. त्याचे अपडेट देखील तुम्हाला या व्हाट्स अप ग्रुपवर मिळतील.
Related
Please login to join discussion