No products in the cart.
एक सुंदर पत्रिका !
नाशिक मिसळ क्लबतर्फे ७ ते ९ एप्रिल २०२३ दरम्यान एका चित्र आणि छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. खरं मिसळ क्लब आणि कला यांचं काय संबंध असा प्रश्न आपल्याला पडू शकतो. पण समाज जर कलाप्रेमी असेल तर असे प्रदर्शन आयोजनाचे दुर्मिळ योग जुळून येतात. नाशिकच्या या कलाप्रेमी मिसळ क्लबने जे प्रदर्शन आयोजित केले याची ही सुंदर पत्रिका. एक मिसळ क्लब जर कलात्मक दृष्टी ठेऊन निमंत्रण पत्रिका तयार करू शकते तर महाराष्ट्रातल्या गल्लोगल्ली पसरलेल्या कला महाविद्यालयांना का शक्य होत नाही ?
छत्रपती संभाजी नगर येथील शासकीय कला महाविद्यालयाच्या वार्षिक प्रदर्शनाची पत्रिका ज्या दर्जाची होती ते बघून आता मिसळ क्लबनेच कला प्रदर्शनाच्या निमंत्रण पत्रिका तयार करण्याचे कंत्राट घ्यावे की काय असा प्रश्न कला वर्तुळाला पडला आहे. यातील विनोदाचा भाग सोडा पण कला महाविद्यालयांनी आपण आयोजित करतो ती प्रदर्शने, त्यांची निमंत्रण पत्रिका, एवढंच नाही आपण शिकवतो ते शिक्षण याबद्दल गंभीर होणे गरजेचे आहे.
*****
Related
Please login to join discussion