No products in the cart.
पल्लवी पंडित यांचा सन्मान !
चित्रकार, लेखिका पल्लवी पंडित यांना ‘भारतीय चित्रकला’ या ग्रंथाच्या अनुवादासाठी पुणे येथील महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्थेचं पारितोषिक जाहीर झालं आहे. ‘भारतीय चित्रकला’ या ग्रंथाचे मूळ लेखक सी. शिवराममूर्ती हे आहेत. रॉयल एशियाटिक सोसायटी ऑफ ग्रेट ब्रिटन अँड आयर्लंडचे मानद फेलो असलेले पद्मभूषण सी. शिवराममूर्ती हे नेत्रदीपक शैक्षणिक कारकीर्द असलेले शिल्पकार, चित्रकार आणि विद्वान होते. ते मद्रास पुरातत्व विभागात अभिरक्षक ( क्युरेटर ) होते. शिवाय भारतीय संग्रहालय, पुरातत्त्व विभाग, कलकत्ता येथे सुपरिन्टेन्डन्ट म्हणूनही कार्यरत होते. राष्ट्रीय संग्रहालय, नवी दिल्ली येथून ते संचालक म्हणून निवृत्त झाले .
त्यांच्या या ग्रंथात प्राचीन काळापासून ते वर्तमान कालखंडापर्यंत भारतीय चित्रकलेचा आढावा घेण्यात आला आहे. या विषयाची व्याप्ती अतिशय मोठी असली तरीही हा विषय अतिशय व्यवस्थितपणे संक्षिप्त स्वरूपात मांडण्यात आला आहे. पल्लवी पंडित यांनी या ग्रंथाच्या अनुवादाची कामगिरी पार पाडली आहे. पल्लवी या चित्रकार असून नागपूरच्या शासकीय कला व अभिकल्प महाविद्यालयातून त्यांनी चित्रकलेचं शिक्षण पूर्ण केलं आहे. त्या विविध माध्यमांसाठी चित्रकला विषयक लेखन करीत असतात.
****
Related
Please login to join discussion