No products in the cart.
‘रंगा येई वो’ मध्ये पराग बोरसे
आज शनिवारी ‘रंगा येई वो’ या दूरदर्शनवरील कार्यक्रम चित्रकार पराग बोरसे यांची मुलाखत घेतली जाणार आहे. पराग बोरसे यांनी मुंबईच्या जेजे स्कूल ऑफ आर्ट्समधून चित्रकलेचे प्रशिक्षण घेतले आहे. २००३ पासून चित्रकला क्षेत्रात ते कार्यरत आहेत.पराग बोरसे वास्तववादी चित्रणासाठी ओळखले जातात. देश, परदेशात त्यांची पोर्ट्रेट चित्रणाची वर्कशॉप्स आयोजित केली जातात. अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पारितोषिकांचे ते मानकरी आहेत. इंटरनॅशनल पेस्टल मासिकाच्या ‘पेस्टल वर्ल्ड’ या पहिल्या आवृत्तीमध्ये चित्रकार पराग बोरसे यांच्या कलाप्रवासावरील लेख प्रकाशित झाला आहे. या मासिकात स्थान मिळवणारे ते एकमेव भारतीय चित्रकार ठरले आहेत.
त्यांचा हा कला प्रवास आपण या मुलाखतीतून जाणून घेऊ शकतो. आज (शनिवारी) संध्याकाळी पाच वाजता दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर ही मुलखात पाहता येईल. मुलाखतच पुनर्प्रक्षेपण २ ऑक्टोबर रोजी दुपारी दोन वाजता होईल.
****
चिन्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करून व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
https://chat.whatsapp.com/IgdCKjB4vEsGVz68ljV34n
‘चिन्ह’चे फेसबुक पेज लाईक करा
https://www.facebook.com/ch
Related
Please login to join discussion