No products in the cart.
छायाचित्र प्रदर्शन
मुंबई येथील जॉली आर्ट अड्डा गॅलरीत ‘अ फोटोग्राफिक इमेज ऍज टेक्स्ट पार्ट’ हे ग्रुप फोटो प्रदर्शन २ ते ३० ऑक्टोबर दरम्यान आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनाच्या संयोजक शुभलक्ष्मी शुक्ला आहेत. मानवी जीवनात अनेकदा संवाद होत नाही. विशेषतः महिला या पुरुषसत्ताक व्यवस्थेमुळे कायम अबोल असतात, बोलण्याची संधी त्यांना उपलब्ध होत नाही. या मूक अनुभूतीला छायाचित्रांच्या स्वरूपात या प्रदर्शनात पाहता येईल. या प्रदर्शनात सुधाकर ओलवे, मनजीत बावा, अनिता अग्रवाल, अनुराधा उपाध्याय, बलबीर कृष्णन, दीप्ती पांडे, जान्हवी खेमका, कुमार रंजन, प्रदीप मिश्रा, प्रदीप धानुस्कर, राजेश एकनाथ, रजनी बैरीगंजन, सुधीर पांडे या छायाचित्रकारांची छायाचित्रे पाहता येतील.
प्रदर्शनाचा पत्ता :
जॉली आर्ट अड्डा,
आय थिंक टेक्नो कॅम्पस, जॉली बोर्ड टॉवर – १
कांजूरमार्ग (पूर्व), मुंबई – ४०००४२
****
चिन्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करून व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
https://chat.whatsapp.com/IgdCKjB4vEsGVz68ljV34n
‘चिन्ह’चे फेसबुक पेज लाईक करा
https://www.facebook.com/chinha.art
Related
Please login to join discussion