No products in the cart.
‘अक्षरभेट’ दिवाळी अंकात नेत्यांची चित्रकला
चित्रकार प्रकाश बाळ जोशी यांनी ‘अक्षरभेट’ या दिवाळी अंकासाठी यंदा राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय नेत्यांच्या चित्रकलेवर लेख लिहिला आहे. लेख रंजक आणि ओघवत्या भाषेत आहेच पण लेखातून खूप नवीन माहितीही मिळते. बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांची कला आपल्या परिचयाची आहे. पण व्हि. पी. सिंग, पंडित नेहरू हे नेतेही चित्रकार होते हे या लेखातून नव्यानेच समजते. पंडित नेहरू रूढार्थाने चित्रकार नसले तरी ते कागदांवर डूडलिंग करायचे. त्यांच्या सचिवाने ही चित्रे आपल्या संग्रहात जपून ठेवली होती. व्ही. पी सिंग हे राजघराण्यातील असल्यामुळे त्यांना चित्रकलेची उपजतच समज होती.
एडॉल्फ हिटलर सारखा क्रूरकर्मा देखील चित्रकार होता. सध्या चीन आणि गल्फ देशांमध्ये त्याच्या चित्रांचा संग्रह करण्याची लाट आली आहे. हिटलरने एका ठिकाणी लिहून ठेवले आहे की व्हिएन्नामध्ये असताना तो दिवसाला दोन, तीन पेंटिंग्ज रंगवत असे. याचबरोबर इंग्लंडची राणी एलिझाबेथ, विन्स्टन चर्चिल, आयसेन हॉवर, जिमी कार्टर हे नेतेही चित्रकलेच्या दुनियेत मुशाफिरी करत हे नव्यानेच कळते.
या लेखामध्ये अनेक रंजक किस्सेही आहेत. जोगेन चौधरी यांनी ममता बॅनर्जी यांच्या चित्रांची तुलना रवींद्रनाथ टागोर यांच्या चित्रांशी केली होती, त्यामुळे वाद झाले होते हेही या लेखात समजते. त्यामुळे ‘अक्षरभेट’ दिवाळी अंकातील हा लेख जरूर वाचा.
****
‘चिन्ह’ चे अपडेट्स मिळवण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करून व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
https://chat.whatsapp.com/C8eaBiY2CjEIqxFvJWmnUD
‘चिन्ह’ चे फेसबुक पेज लाईक करा
https://www.facebook.com/chinha.art
‘चिन्ह’चे टेलिग्राम चॅनल खालील लिंकवर क्लिक करून जॉईन करा
https://t.me/ChinhaMag
Related
Please login to join discussion