News

‘पोस्टर’ पुस्तकाचे प्रकाशन

‘पोस्टर’ हे जाहिरात कला आणि चित्रकला यांचे सुरेख मिश्रण असते. पोस्टर्सच्या माध्यमातून समाजप्रबोधन अतिशय चांगल्या प्रकारे करता येते. याच विचाराचा आधार घेऊन अनुप प्रकाशनातर्फे ‘पोस्टर’ हे पुस्तक प्रकाशित करण्यात येत आहे. दि १२ मार्च २०२३ रोजी सकाळी साडेदहा वाजता या पुस्तकाचे प्रकाशन बालगंधर्व कलादालन, पुणे येथे आयोजित करण्यात आले आहे. चित्रकार मिलिंद फडके यांनी या पुस्तकाचं लेखन केलं आहे तर संकल्पन आणि संपादन हे चित्रकार सुरेश वरगंटीवार यांनी केलं आहे. या पुस्तकाचे प्रकाशन लेफ्टनंट जनरल विनायक पाटणकर यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष हे डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष शरद कुंटे आहेत. ‘पोस्टर’ या पुस्तकातील निवडक पोस्टर्सचे प्रदर्शन दि १२ ते १६ मार्च २०२३ दरम्यान बालगंधर्व कलादालन येथे आयोजित करण्यात आले आहे.


भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानंतर आपण शहात्तराव्या वर्षात पदार्पण केले आहे आधुनिक भारतात, सर्वांगीण विकासाकडे देशाची वाटचाल सुरु आहे . दूरसंचाराच्या आधुनिक सोयी सुविधांनी जग अधिकाधिक जवळ येत आहे . सहाजिकच सामाजिक जाणीवाही जागृत होत आहेत. परंतु प्रगतीपथावर वाटचाल करतांना, अद्यापही अज्ञान, रूढी, परंपरा, अंधश्रध्दा यांचा फार मोठा अडसर दूर करावयाचा आहे. पोस्टर या माध्यमाचा वापर करून कृतिशील डिझायनर्स समाजप्रबोधन कसे करू शकतात, याचे मार्गदर्शन या पुस्तकातून करण्याचा प्रयत्न लेखक मिलिंद फडके यांनी केला आहे.

या पुस्तकातील पोस्टर्सचे विषय वैविध्यपूर्ण आहेत. पाणी वाचवा, लेक वाचवा, नेत्रदान, व्यसनमुक्ती, भ्रष्टाचार, रक्तदान, साक्षरता, लोकसंख्या नियंत्रण, शिक्षण, कुटुंब नियोजन बालमजुरी, स्त्री शिक्षण, हुंडाबळी, स्वच्छता अभियान, आरोग्य, राष्ट्रीय एकात्मता, पर्यावरण , वृक्षारोपण, दहशतवाद , गर्भजल परिक्षा, स्तनपान, सांस्कृतिक वारसा या व अशा अनेक विषयांवर १०० हून अधिक पोस्टर्सचा या पुस्तकात समावेश आहे . यातील प्रत्येक पोस्टर्सचे गुण विश्लेषण सोबत देण्यात आले आहे. यामुळे कोणत्या गुणविशेषांमुळे प्रत्येक पोस्टर प्रभावी झाले आहे हे समजून घेता येते. तसेच या पुस्तकात १००० पेक्षा अधिक घोषवाक्ये समाविष्ट करण्यात आली आहेत. संदर्भासाठी व नवीन घोषवाक्ये लिहितांना यांचा उपयोग चित्रकला, उपयोजित कला या क्षेत्रातील विद्यार्थी , कलाकार , शिक्षक तसेच जाहिरात क्षेत्रातील व्हिजुअलायझर्स, डिझाईनर्स व पोस्टर ‘ माध्यमातून समाज प्रबोधन करू इच्छिणाऱ्या कोणत्याही नागरिकांना व संस्थाना उपयुक्त ठरेल. यामधील बहुसंख्य पोस्टर्सना राज्य व राष्ट्रीय पातळीवरील पुरस्कार मिळाले आहेत.

पुस्तक खरेदी करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी सुरेश वरगंटीवार यांच्याशी +91 98503 35617 या क्रमांकावर संपर्क साधावा.

******

Related Posts

1 of 83

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.