No products in the cart.
प्रदीप राऊत यांचे निधन
वसई येथील चित्रकार प्रदीप राऊत यांचे काल दिनांक ९ ऑक्टोबर रोजी निधन झाले. काही दिवसापासून ते यकृताच्या आजाराने त्रस्त होते. या आजारातील गुंतागुंतीमुळे त्यांचे निधन झाले. प्रदीप राऊत हे जेजे स्कूल ऑफ आर्टचे विद्यार्थी. १९९५ मध्ये शिक्षण पूर्ण झाल्यानंतर व्यावसायिक चित्रकार म्हणून त्यांनी आपली कारकीर्द सुरु केली. ‘आर्ट प्लाझा’ या गॅलरीसाठी ते आरंभापासून काम करत होते. जेजेचे विद्यार्थी असताना त्यांनी अनेक अभिनव उपक्रम राबवले. निसर्ग चित्रणासाठी ते अनेक अभ्यास सहलींचे आयोजन करत असत. ‘क्लोज टू नेचर’ या निसर्ग अभ्यास मंडळाची त्यांनी स्थापना केली होती. गरजू विद्यार्थ्यांना ते प्रोत्साहनपर मदत करत असत.
‘सलाम मुंबई’ या नावाने ते मुंबईतील प्रेक्षणीय स्थळांच्या चित्रणाची स्पर्धा आयोजित करत असत. याशिवाय ‘दहा हजार स्केचेस’चा पोर्टफोलिओ या अभिनव स्पर्धेचे आयोजनही ते करत असत. याचप्रमाणे निसर्ग चित्रणाच्या ऑनलाईन स्पर्धाही त्यांनी आयोजित केल्या होत्या.
त्यांच्या निधनामुळे कला क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे. चिन्ह आर्ट न्यूज परिवारातर्फे प्रदीप राऊत यांना भावपूर्ण श्रद्धांजली!
*****
‘चिन्ह’ चे अपडेट्स मिळवण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करून व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
https://chat.whatsapp.com/IgdCKjB4vEsGVz68ljV34n
‘चिन्ह’ चे फेसबुक पेज लाईक करा
https://www.facebook.com/chinha.art
‘चिन्ह’चे टेलिग्राम चॅनल खालील लिंकवर क्लिक करून जॉईन करा
https://t.me/ChinhaMag
Related
Please login to join discussion