No products in the cart.
प्रज्ञा मोहिते यांचे चित्र प्रदर्शन
दि ३१ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर दरम्यान चित्रकार प्रज्ञा मोहिते यांचे ‘मेटामॉर्फोसिस’ हे चित्र प्रदर्शन बजाज आर्ट गॅलरी, मुंबई येथे आयोजित करण्यात आले आहे. या चित्रांमागची संकल्पना म्हणजे निसर्गाचं सातत्य हा निसर्गाचा ‘आत्मा’ही आहे. निसर्गातील कुठल्याच गोष्टीचं अस्तित्व पूर्णपणे संपत नाही. केवळ एका आकारातून दुसऱ्या आकारात रूपांतर होते. हे चक्र निरंतर चालू आहे. पण हे चक्र वर्तुळाप्रमाणे स्थिर नाही. एका बिंदूतून चालू होऊन ते त्याच बिंदूत पूर्ण होत नाही. ते चल आहे. अंड्यातून सुरवंट बाहेर येणं, त्याचा कोष बनणं, कोषामधून फुलपाखरू बाहेर येणं आणि त्याने पुन्हा अंडी देणं, आणि त्याचं पुन्हा सुरवंट होणं, हे चक्र अनादी अनंत काळापासून चालू आहे आणि चालू राहील. त्याचे आकार फक्त बदलत राहतील, त्याचा ‘आत्मा’ मात्र तोच राहील.
निसर्गाचं हे सुंदर चक्र अनुभवण्यासाठी या प्रदर्शनाला भेट द्यावी असे आवाहन प्रज्ञा मोहिते यांनी केले आहे.
प्रदर्शनाची वेळ सकाळी ११ ते संध्याकाळी सातपर्यंत आहे.
प्रदर्शनाचा पत्ता :
बजाज आर्ट गॅलरी, ग्राउंड फ्लोर, बजाज भवन, २२६, नरिमन पँट, मुंबई – ४०००२१
****
‘चिन्ह’ चे अपडेट्स मिळवण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करून व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
https://chat.whatsapp.com/C8eaBiY2CjEIqxFvJWmnUD
‘चिन्ह’ चे फेसबुक पेज लाईक करा
https://www.facebook.com/chinha.art
‘चिन्ह’चे टेलिग्राम चॅनल खालील लिंकवर क्लिक करून जॉईन करा
https://t.me/ChinhaMag
Related
Please login to join discussion