No products in the cart.
प्रफुल्ला डहाणूकर पुरस्कार सोहळा संपन्न !
भारतातील तरुण चित्रकारांना व्यासपीठ मिळवून देण्याच्या उद्देशानं प्रफुल्ला डहाणूकर आर्ट फाउंडेशनतर्फे जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये १२ ते १८ एप्रिल या कालावधीत पार पडलं. यंदाचं हे आठवं कलानंद प्रदर्शन बजाज इलेक्ट्रिकल फाउंडेशनच्या सहकार्यानं आयोजित करण्यात आलं होतं.
प्रफुल्ला डहाणूकर आर्ट फाउंडेशनच्या ( PDAF ) विश्वस्त गौरी मेहता यांनी या सोहळ्याबद्दल उपस्थितांना माहिती दिली. केरळचे टिटो स्टॅनली, महाराष्ट्राचे हर्षित बोन्द्रे तसेच नागनाथ देवकर, हिमाचल प्रदेशच्या शेरिंग नेगी, हरियाणाच्या स्तुती जैन, गुजरातचे राजू बरैय्या, संदीप सुनेरिया तसेच कनिका शाह, पश्चिम बंगालचे सॉरीफुल मॅाण्डल, उत्तर प्रदेशच्या विजया चौहान या कलावंतांना त्यांच्या कलेचा सन्मान म्हणून प्रत्येकी ५०,००० रुपयाची ग्रांट देण्यात आली. फाउंडेशनसोबत जोडल्या गेलेल्या कोविड बाधित दहा राज्यातील दहा कलाकारांना देखील या सोहळ्यात आर्थिक साहाय्य देण्यात आलं. गेल्या पाच वर्षात सुमारे असंख्य तरुण कलाकारांना ४.८ कोटीहून अधिक रकमेची पारितोषिकं संस्थेनं प्रदान केली आहेत.
फाउंडेशनबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
Related
Please login to join discussion