No products in the cart.
प्रा राजीव मिश्रा पायउतार !
महाराष्ट्राच्या प्रभारी कलासंचालक पदावरून प्रा राजीव मिश्रा यांची उचलबांगडी केली असून त्या जागी तातडीनं जे जे स्कूल ऑफ आर्ट ( आर्टस् नव्हे ) चे अधिष्ठाता प्रा विश्वनाथ साबळे यांची नेमणूक करण्यात आली आहे .या संदर्भात जेजे परिसरात कानोसा घेतला असता असे कळले की प्रा मिश्रा हे जेजेला डिनोव्हा मिळावा यासाठी शिक्षणमंत्र्यांनीच नेमलेल्या समितीचे प्रमुख होते आणि ते अतिशय क्रियाशील पद्धतीनं आपलं काम पार पडत होते . त्यांच्या समितीनं अतिशय प्रभावी पद्धतीनं काम केल्यामुळेच जेजेला डिनोव्हा मिळण्याचा मार्ग सुकर झाला होता . पण मध्येच श्री उदय सामंत यांच्या भूमिकेत बदल झाला आणि ते राज्य कला विद्यापीठाची भाषा करू लागले , तो पर्यत राजीव मिश्रा यांची समिती पुढं निघून गेली होती .
आता आपला हेतू सफल करायचा असेल तर राजीव मिश्रा याना काढून तिथं एखादा होयबा अधिकारी आणून बसवायला हवा या भूमिकेतूनच हा बदल घडवला गेला आहे असं जेजेतले जाणकार सांगतात .’ सामंतांनी आडमुठेपणा केला तर पुढं काय ? ‘ अशी विचारणा डिनोव्हो पुरस्कर्त्यांकडे केली असता त्यांनी अतिशय सुस्पष्टपणे भूमिका मांडली की ‘ लोकशाही व्यवस्थेत सामोपचाराने प्रश्न सोडवायचे मार्ग खुंटले का न्यायालयाचा मार्ग स्वीकारणं भाग पडतं , वेळ आली तर आम्ही त्या मार्गावरून जायला देखील मागं पुढं पाहणार नाही ‘ असं त्यांनी स्पष्ट केलं .सुदैवानं या क्षेत्रातल्या दिग्गजांनी आपणहून आमच्याशी संपर्क साधला आहे , ही आमची नव्हे तर जेजे संस्कृतीची पुण्याई आहे असं देखील नम्रपणे सांगावयास ते विसरले नाहीत .
Related
Please login to join discussion