No products in the cart.
राहुल देशपांडे यांना गुणीजन कला पुरस्कार
चित्रकार राहुल देशपांडे यांना रवी परांजपे फाउंडेशनतर्फे देण्यात येणारा ‘गुणीजन कला पुरस्कार’ जाहीर झाला आहे. हा पुरस्कार सिम्बायोसिस शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शां. ब. मुजुमदार यांच्या हस्ते देण्यात येईल. दृश्यकला क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना गुणीजन कला पुरस्कार देण्यात येतो. चित्रकार राहुल देशपांडे हे गेल्या तीस वर्षांपासून चित्रकला, इलस्ट्रेशन, डिझाईन अशा विविध माध्यमात उल्लेखनीय कार्य करत आहेत. चित्रकलेवर त्यांची वीसपेक्षा अधिक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. याशिवाय सिम्बायोसिस डिझाईन इन्स्टिट्यूटच्या ग्राफिक डिझाईन विभागात ते प्राध्यापक म्हणून काम करत आहेत.
हा पुरस्कार प्रदान सोहळा दिनांक ८ ऑक्टोबर २०२२ रोजी सकाळी ११ वाजता रवी परांजपें स्टुडियो येथे देण्यात येईल. दिनांक १६ ऑक्टोबर रोजी राहुल देशपांडे कला रसिकांना सकाळी ११ ते १२ दरम्यान प्रात्यक्षिक देतील. हे प्रदर्शन दिनांक ८ ते १६ ऑक्टोबर दरम्यान रसिकांना पाहता येईल. ९ ऑक्टोबर रोजी चित्रकार राहुल देशपांडे यांच्याशी सकाळी ११ ते १२ दरम्यान प्रेक्षकांना संवाद साधता येईल.
या कार्यक्रमास जास्तीत जास्त कलारसिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन रवी परांजपे फाउंडेशनच्या ट्रस्टी स्मिता परांजपे यांनी केले आहे.
कार्यक्रमाचा पत्ता :
रवी परांजपे स्टुडिओ,
ऋतिका अपार्टमेंट , 1098/5-A मॉडेल कॉलनी, शिवाजीनगर , पुणे – 411016
संपर्क क्रमांक : 094054 36175
****
चिन्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करून व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
https://chat.whatsapp.com/IgdCKjB4vEsGVz68ljV34n
‘चिन्ह’चे फेसबुक पेज लाईक करा
https://www.facebook.com/chinha.art
Related
Please login to join discussion