News

आंध्रप्रदेशात सापडले श्रीगणेशाचे दुर्मिळ शिल्प

गणेशाची विविध सगुण रुपे आपण पाहिली आहेत. आपल्या नेहमीच्या पाहण्यातल्या गणेशमूर्तीने पाश,परशु अशी आयुधे धारण केलेली असली त्याचा चेहरा मात्र नेहमी सोज्वळ मोहकच दिसतो. युद्धसज्ज लढाऊ गणपतीचे चित्र किंवा शिल्प कोठे आढळले नव्हते. पण आता आंध्रप्रदेशातील पलनाडू जिल्ह्यातील माचेर्ला शहरातील प्रसिद्ध अशा चेन्नकेशव स्वामी मंदीरात श्रीगणेशाचे लढाऊ मुद्रेतील शिल्प नुकतेच आढळून आले आहे. विशेष म्हणजे मंदीरातील या पुरातत्वियदृष्ट्या लक्षणिय आणि दुर्मिळ शिल्पाकडे आजवर मंदीर प्रशासनाचे लक्ष गेले नव्हते. नामवंत पुराततत्त्वशास्त्रज्ञ आणि प्लिच इंडीया फाऊंडेशनचे सीईओ डॉ. शिवनगी रेड्डी यांना गणेशाचे हे मौल्यवान शिल्प सापडले. ‘भविष्यातील पिढ्यांसाठी वारशाचे संवर्धन’ या जागृती उपक्रमांतर्गत मार्चेला शहर आणि आसपासच्या परिसरात आयोजित करण्यात आलेल्या अभ्यास दौऱ्या दरम्यान शिवनगी रेड्डी यांना हे दुर्मिळ शिल्प सापडले.
शिवनगी रेड्डी हे गेल्या चार दशकांपासून आंध्रप्रदेश आणि तेलंगणा या तेलगु राज्यातील दुर्मिळ ऐतिहासिक शिल्पे प्रकाशात आणण्याचे काम करत आहेत.
”ही माझ्यासाठी अतिशय विस्मयकारक शोध आहे, पुरात्तत्व विषयाच्या एवढ्या वर्षांच्या प्रदीर्घ अभ्यासात असे शिल्प यापूर्वी कधीच आढळले नव्हते.”, असे डॉ. रेड्डी यांनी म्हटले आहे.
रंगमंडप खांबाच्या मध्यभागात हे शिल्प कोरण्यात आले आहे. स्तंभावरील चौकटीत दुरासाद या दैत्याच्या वधाचे दृश्य तपशिलवार साकारले आहे. गणेश पुराणात वर्णन केल्याप्रमाणे गणेशाने प्रखर युद्ध करत दैत्याचा वध केला. हा प्रसंग येथे चितारला आहे. साधारणपणे गणेशाच्या प्रतिमा ललितासनामध्ये बसलेल्या आढळून येतात पण या दुर्मिळ शिल्पातील गणेशाने एका हातात परशु तर दुसऱ्या हातात पाश धारण केला आहे आणि अलिधासनामध्ये उभा राहून तो अन्य दोन हातांनी दैत्याशी लढत आहे. अशाप्रकारातले गणेशाचे हे एकमेव शिल्प अलल्याची माहिती डॉ. रेड़्डी यांनी दिली. या दुर्मिळ शिल्पाची तपशिलवार माहिती देणारे फलक मंदीर प्रशासनाने उपलब्ध करून द्यावेत तसेच याचे योग्य संवर्धन आणि देखभाल व्हावी अशी मागणीही रेड्डी यांनी केली आहे.
(बातमीतील छायाचित्र इंटरनेटवरून साभार)

चिन्हचे लेटेस्ट अपडेट मिळवण्यासाठी खालील व्हाट्सएप लिंकवर क्लीक करून ग्रुप जॉईन करा
https://chat.whatsapp.com/J3E5Y5hTzDXEEWD4cQW2rP

चिन्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी चिन्हचे फेसबुक पेज लाईक करा.
https://www.facebook.com/chinha.art

 

Related Posts

1 of 83

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.