News

रवी परांजपे यांचे सिंहावलोकन प्रदर्शन !

प्रख्यात चित्रकार रवी परांजपे यांच्या “व्हिज्युअल मेलडी” या सिंहावलोकन प्रदर्शनाचं आयोजन दि  20 जून ते 26 जून 2023 या कालावधीत मुंबईतील जहांगीर आर्ट गॅलरीत करण्यात आलं आहे.

रवी परांजपे यांच्या कलाकृती म्हणजे चित्र तंत्रावरील हुकुमी पकड. रवी परांजपे यांचं कलेचं तत्वज्ञान साधं सोपं होतं. एखाद्या सुंदर फुलाप्रमाणे चित्रनिर्मिती करणं आणि त्यातून निर्माण होणारा सर्जनशीलतेचा आनंद रसिकांमध्ये वाटणं इतकं साधं असं ते तत्वज्ञान. त्यामुळे रवी परांजपे यांची चित्रं विशुद्ध आनंद निर्माण करतात.

1980 मध्ये रवी परांजपे यांचं पहिलं प्रदर्शन जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये  भरलं होतं. त्या प्रदर्शनानंतर परांजपे यांनी प्रचंड लोकप्रियता मिळवली आणि “रंग आणि रेषांचा राजा” म्हणून ते ओळखले जाऊ लागले. वेगवेगळी माध्यमं वापरुन तयार केलेली चित्रं रसिकांना अतिशय आवडतात.

रवी परांजपे फाऊंडेशन तर्फे या प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे. कलारसिक या प्रदर्शनात परांजपे यांच्या सुरुवातीच्या काळापासून  ते अगदी अलीकडच्या काळापर्यंतची निवडक चित्रं पाहू शकतील.

प्रदर्शनाची वेळ  सकाळी 11:00 ते संध्याकाळी 7:00 वाजेपर्यंत आहे.

या  प्रदर्शनात प्रदर्शित केलेली चित्रे आणि कलाकृती विक्रीसाठी उपलब्ध नाहीत याची कला रसिकांनी नोंद घ्यावी.

अधिक माहिती आणि चौकशीसाठी, +91 94 23 562 530 किंवा +91 98 81 104 284 या क्रमांकावर  संपर्क साधावा किंवा abhijatkala@gmail.com या मेल आयडी वर ईमेल करावा. रवी परांजपे आणि फाउंडेशनबद्दल अधिक तपशील संस्थेच्या अधिकृत वेबसाइट www.raviparanjape.org वर मिळू शकेल.

Related Posts

1 of 83

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.