No products in the cart.
सीएसएमव्हीएस येथे ‘राइझोम’ प्रदर्शन…
छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय येथे दि 28 एप्रिल ते 23 जून 2023 दरम्यान ‘राइझोम’ या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. राइझोम म्हणजे प्रकंद. प्रकंद हे हा वनस्पतीचा विशिष्ट प्रकार असतो. ज्यात वनस्पतीची मुळं ही एकमेकात गुंतलेली असतात. या गुंतागुंतीप्रमाणे भूतकाळ-वर्तमान, परंपरा-आधुनिक, प्रतिमा-शब्द यांच्यातील सीमारेषा जोडत, हे प्रदर्शन सौंदर्यशास्त्र, राजकारण, सांस्कृतिक-चिन्हे, आठवणी, कथा आणि साहित्य यांच्या परस्पर संबंधांचा मागोवा घेते.
या प्रदर्शनात आदिती जोशी, अरुणकुमार एचजी, अतुल भल्ला, जी. आर इराणा, मेघना सिंग पटपटीया, एम. प्रावत, पूजा इराणा, रत्ना गुप्ता, रीना सैनी कल्लट, संजीव खांडेकर, वैशाली नाडकर, रीना सैनी कल्लाट, सुमाक्षी सिंग, विराग देसाई आणि सारिका बजाज यांच्या कलाकृतींचा समावेश आहे. या प्रदर्शनाचे संयोजन जेसल ठक्कर यांनी केले आहे.
प्रदर्शनाची वेळ सकाळी 11:00 ते संध्याकाळी 06:00 वाजेपर्यंत आहे.
अधिक माहितीसाठी खालील निमंत्रण पत्रिका पाहावी.
Related
Please login to join discussion