No products in the cart.
साधना बहुळकरांना पुरस्कार प्रदान
दि २४ सप्टेंबर रोजी साधना बहुलकर यांना महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे अरुणा ढेरे यांच्या हस्ते कै. कृष्ण मुकुंद पुरस्कार प्रदान करण्यात आला.या कार्यक्रमाला कृष्ण मुकुंद उजळंबकर यांच्या कन्या नलिनी गुजराथी, परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा मिलिंद जोशी, कार्यवाह प्रकाश पायगुडे आणि कोषाध्यक्ष सुनिताराजे पवार उपस्थित होते. या कार्यक्रमात अरुणा ढेरेंनी साधना बहुळकरांच्या संशोधनातल्या परिश्रमांना दाद दिली. स्त्री चित्रकारांच्या कामगिरीची नोंद स्त्रीलाच करावी लागली हे अधोरेखित केले. त्या काळातल्या स्त्रियांवर काळाचा म्हणजेच परिस्थितीचा केवढा दबाव होता ते स्पष्ट केले . काळ हा सर्वभक्षक असून काळाच्या जबड्यात हात घालून संदर्भ मिळवावे लागतात असे मत अरुणा ढेरे यांनी मांडले. अमृता शेरगिलला परदेशात जे एक्स्पोजर मिळाले त्या मानाने बॉम्बे स्कूलच्या भारतीय स्त्री चित्रकारांना मिळाले नाही हे त्यांनी लक्षात आणून दिले . मिलिंद जोशींनी आजकाल पृथगात्मता जपण्याच्या नादात परंपरेकडे दुर्लक्ष करण्याचा ट्रेंड आलाय तो अयोग्य आहे असे सांगितले. साधना बहुळकरांनी पुस्तकाच्या विषया मागील हेतू, प्रेरणा, आणि काही अनुभव सांगितले.
****
चिन्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करून व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
https://chat.whatsapp.com/IgdCKjB4vEsGVz68ljV34n
‘चिन्ह’चे फेसबुक पेज लाईक करा
https://www.facebook.com/ch
Related
Please login to join discussion