No products in the cart.
जेजेमध्ये कलाकृती अडगळीत?
चित्रकार संतोष मोरे यांचे एक खूपच मोठं पेंटिंग जेजे महाविद्यालयाच्या संग्रहात आहे. संतोष मोरे हे प्रतिथयश चित्रकार. कॉलेजने त्यांचे चित्र आपल्या संग्रही ठेवले पण काहीच वर्षात हे चित्र एका कोपऱ्यात अडगळीत धूळ खात पडले आहे. फ्रेमचा टवका उडाला आहे. एखाद्या भंगाराच्या दुकानातही यापेक्षा चांगली परिस्थिती असते.
जेजेच्या वैभवशाली परंपरेला एवढे वाईट दिवस यावेत यापेक्षा दुर्दैवी काय असू शकते. जेजेच्या भव्य अशा वास्तूची परिस्थितीतही तर धारावीच्या झोपड्पट्टीपेक्षाही भयंकर झाली आहे. संस्थेचे डीन अशा कुठल्या ‘अर्थ’पूर्ण कामात गुंतलेले असतात की त्यांना हा ठेवा सांभाळायला वेळ, बजेट आणि सवड मिळत नाही? जर संस्था हा अमूल्य ठेवा सांभाळू शकत नसेल तर एखाद्या कलाविषयक संस्थेला किंवा आर्ट गॅलरीला सरळ दान करून टाकावे, किमान या कलाकृतींची निगा तर राखली जाईल.
संतोष मोरे यांची कलाकृती हे तर एक उदाहरण आहे, अशा कित्येक कलाकृती जेजेमध्ये धूळ खात पडून आहेत. त्यांची योग्य व्यवस्था करण्याची जवाबदारी संस्थेचे डीन आणि शासन यांची आहे. नवीन विद्यार्थी जेव्हा संस्थेत प्रवेश घेतात तेव्हा ही भयाण अवस्था बघून संस्थेबद्दल त्यांचे काय मत बनत असेल ? याचा विचार प्रशासनाने करावा अन्यथा इतक्या मोठ्या संस्थेला कोणीही गांभीर्याने घेणार नाही हे निश्चित.
‘चिन्ह’ चे अपडेट्स मिळवण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करून व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
https://chat.whatsapp.com/C8eaBiY2CjEIqxFvJWmnUD
‘चिन्ह’ चे फेसबुक पेज लाईक करा
https://www.facebook.com/chinha.art
‘चिन्ह’चे टेलिग्राम चॅनल खालील लिंकवर क्लिक करून जॉईन करा
https://t.me/ChinhaMag
Related
Please login to join discussion