No products in the cart.
‘सर्वात्मक’चे पाडव्याला उद्घाटन !
इंदिरा नगर, नाशिक येथील सर्वात्मक वाचनालयातर्फे परिसरातील रसिकांना कलेचा आनंद घेता यावा यासाठी कलादालनाची निर्मिती करण्यात आली आहे. या कलादालनाचे उद्घाटन बुधवार दि. २२ मार्च २०२३ रोजी गुढी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर सायं ५-३० वाजता जिल्हा ग्रंथालय प्रमुख सचिन जोपुळे , उद्योजक वसंतराव खैरनार, चित्रकार रामदास महाले, चित्रकार भिमराज सावंत, चित्रकार वासुदेव मराठे यांच्या उपस्थितीत होणार आहे.
या निमित्ताने सर्वात्मक कलादालन व कलामुद्रा ग्रुप तर्फे भरवल्या जाणाऱ्या या प्रदर्शनात नीलेश भारती, शैलेश मेश्राम, मोहन जाधव, संजय दुर्गवाड, कैलास लहानगे, विलास गायकवाड, राकेश सुर्यवंशी , नरेश महाले, ज्ञानेश्वर टोणपे, जितेंद्र घाटगे, सुमित भारद्वाज, सचिन काळे, वैभव गायकवाड, राहुल सातपूते, अविष्कार विसपुते या कलावंतांचा सहभाग आहे.
या प्रदर्शनाचा कालावधी बुधवार दि. २२ मार्च ते रविवार दि २६ मार्च २०२३ पर्यंत आहे. प्रदर्शनाची वेळ सकाळी १० ते ०१ व सायं ५ ते ८ वाजेपर्यंत असणार आहे. दि २६ मार्च रविवार रोजी प्रसिद्ध चित्रकारांची प्रात्यक्षिके होणार आहेत. कला रसिकांनी याचा जरुर लाभ घ्यावा असे कलादालनाचे प्रमुख विलास टिळे यांनी आवाहन केले आहे. हे कला प्रदर्शन विनामूल्य आहे.
प्रदर्शनाचा पत्ता: सर्वात्मक कलादालन , बापू बंगला स्टॉप, स्टेट बँके समोर, इंदिरा नगर, नाशिक.
Related
Please login to join discussion