News

सत्यजित भोसले यांना पुरस्कार !

शासकीय कला व अभिकल्प महाविद्यालय, छ. संभाजीनगरचे माजी विद्यार्थी सत्यजित भोसले यांना गड किल्ले स्वच्छता मोहिमेतील उल्लेखनीय कार्याबद्दल IESA Industry Excellence Awards 2023 पुरस्कार देण्यात आला आहे. सत्यजित भोसले हे ‘सेवेचे ठाई तत्पर’ या सेवाभावी संस्थेचे संस्थापक आहेत. या संस्थेच्या माध्यमातून गड किल्ले स्वच्छता आणि संवर्धनाची मोहीम आयोजित केली जाते. विशेषतः प्लास्टिक कचरा हटवणे, किल्ल्यांवर वृक्षारोपण करणे, किल्ल्यांवरील नैसर्गिक पाण्याच्या स्त्रोतांची स्वच्छता करणे या कामात ही संस्था पुढाकार घेते. सत्यजित यांनी आत्तापर्यंत 100 पेक्षा जास्त कॅम्प आयोजित करून महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांच्या स्वच्छतेची मोहीम यशस्वी केली आहे.

भारतीय ऊर्जा मंत्रालय व उद्योग मंत्रालय तसेच जी 20 अशा शासकीय विभागांच्या पुढाकाराने India Energy Storage Alliance (IESA) अंतर्गत जगभरात ऊर्जा या विषयाशी पर्यावरणाला पूरक अशा प्रकारचे संलग्न कार्य करणाऱ्या सर्व कंपनीज आणि संस्था याना प्रोत्साहन देण्यासाठी IESA Industry Excellence Awards 2023 घोषित करण्यात आला होता. या पुरस्कारासाठी जगभरातून 250 पेक्षा जास्त संस्थांना नामांकन मिळाले होते. परंतु ‘दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा’ या वाक्यास न्याय देत ‘सेवेचे ठाई तत्पर’ या संस्थेने विजेतेपद पटकावले आहे. हा पुरस्कार संस्थेतर्फे रायगड व राजगड येथे करण्यात आलेल्या स्वच्छ्ता मोहीम व कचरा व्यवस्थापनातील कल्पकतेला देण्यात आला असून पुढील वर्षभरासाठी शासनाकडून संस्थेस सर्वतोपरी आर्थिक व कायदेशीर पाठबळ मिळणार आहे. अशी माहिती सत्यजित भोसले यांनी दिली.

संस्थेच्या उपक्रमासंबंधी अधिक माहिती घेण्यासाठी https://www.sevechethayitatpar.in/ या वेबसाईटला भेट द्या.

Related Posts

1 of 83

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.