No products in the cart.
जेजे पाकिस्तानात जाणार नाहीये !
‘महाराष्ट्र टाइम्स’च्या आजच्या अंकात ‘जेजेचे काय व्हावे ?’ या शीर्षकाचा श्री सुरेंद्र जगताप यांनी लिहिलेला लेख प्रसिद्ध करण्यात आला आहे. श्री सुरेंद्र जगताप हे महाराष्ट्र राज्य चित्रकला महाविद्यालयीन शिक्षक शिक्षकेतर संघटनेचे अध्यक्ष आहेत, असा त्यांचा परिचय लेखाच्या शेवटी दिला आहे.
या लेखावर आमची प्रतिक्रिया आम्ही लवकरच प्रकाशित करू, पण हा लेख संपादित करताना संपादकांनी थोडं तारतम्य ठेवावयास हवे होते असे मात्र प्रकर्षाने जाणवले. कारण या लेखाला जो इंट्रो दिला आहे त्यामध्ये ‘जेजे या अद्याक्षरांनी ओळखला जाणाऱ्या खरेतर तीन शिक्षण संस्था एकाच आवारात आहेत ( यात नवे काय सांगितले ? त्या तिथे १०० वर्षांपेक्षा अधिक काळ आहेतच ). या तीनही संस्थांचे एकत्रित विद्यापीठ झाले तरच ते सर्व विद्यार्थ्यांच्या हिताचे ठरेल, असे विधान केले आहे. खरे तर ते तसेच होणार आहे. या तीन शिक्षणसंस्था एकत्र करून त्याचे अभिमत विद्यापीठच होणार आहे. आता अभिमत विद्यापीठ केले म्हणजे ते केंद्र सरकारच्या हाती जाईल असा जो सूर या इंट्रोमध्ये उमटला आहे तो योग्य नव्हे. केंद्रसरकारच्या हाती जाईल म्हणजे काय ते पाकिस्तानात जाणार नाहीये ! भारतातच राहणार आहे. आणि मुख्य म्हणजे १५० वर्षांपेक्षा अधिक जुन्या हेरिटेज संस्थांना असे कुठलेच नियम लागू होत नाहीत. महाराष्ट्र सरकार पुरस्कृत ‘अनन्य अभिमत विद्यापीठ’ असं त्याचं स्वरूप राहणार आहे. त्यामुळेच हा लेख प्रसिद्ध करताना संपादकांनी आपल्याप्रमाणे वाचकांचा देखील गैरसमज होणार नाही, याचा विचार करणं अत्यावश्यक होतं. जेजेच्या या तीनही कला महाविद्यालयांशी ज्यांचा दुरान्वयाने देखील संबंध नाही, अशा मंडळींनी केलेल्या प्रचाराला ‘महाराष्ट्र टाइम्स’ सारख्या वृत्तपत्राने बळी पडायला नको होतं. तरी देखील हा लेख ‘Chinha Art News’च्या वाचकांपर्यंत पोहोचावा या हेतूनं इथं देत आहोत. त्यावर वाचकांनी आपल्या प्रतिक्रिया आम्हाला अवश्य कळवाव्यात हे आवाहन.
Related
Please login to join discussion