No products in the cart.
जेजे : झारीतले शुक्राचार्य
कला शिक्षण महाचर्चेचे कार्यक्रम मधल्या विश्रांतीनंतर बुधवार पासून पुन्हा सुरु होत आहेत. जेजेच्या परिसरात सध्या अभिमत विद्यापीठाची चर्चा जोर धरू लागली आहे. खरं तर गेल्या तीन चार वर्षांमध्ये दबक्या आवाजात ही चर्चा सुरु होती, पण रत्नागिरीच्या राज्यकला प्रदर्शनात अभिमत विद्यापीठाची घोषणा करून उच्चशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी कलाशिक्षण वर्तुळाला सुखद धक्का दिला खरा, पण दुसऱ्याच दिवशी मात्र जे जे स्कूल ऑफ आर्टच्या परिसरातील तीन महाविद्यालयांचं मिळून राज्यस्तरीय विद्यापीठ ( म्हणजे काय ? ) स्थापनेसाठी अभ्यास समिती स्थापन करून संबंधितांना अक्षरशः दाणकन जमिनीवर आपटले ! महाराष्ट्र राज्यासारख्या प्रागतिक विचारांच्या राज्याचा शिक्षणमंत्री असे परस्पर विरोधी निर्णय कसे घेऊ शकतो, या विचाराने कलाशिक्षण वर्तुळ चक्रावून गेले.
बुधवार दि. १३ एप्रिल २०२२ रोजी सायं ०५.३० वाजता यु ट्युबवर होणाऱ्या एका विशेष कार्यक्रमात ‘जेजे अभिमत विद्यापीठ : झारीतले शुक्राचार्य कोण ?’ या विषयावर चर्चा होणार आहे. त्यात सहभागी होणार आहेत नामवंत कलाशिक्षणतज्ञ डॉ. सुभाष पवार, शिक्षण खात्यातील सेवानिवृत्त अधिकारी सुरेश खरे, लेखक चित्रकार आशुतोष आपटे, जेजे संदर्भात ज्यांनी पिटिशन दाखल केली आहे ते जेजे आर्किटेक्टचे माजी विद्यार्थी रवी सारंगन, चित्रकार शिल्पा जोगळेकर आणि चित्रकला शिक्षणतज्ञ शिरीष मिठबावकर. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणार आहे ‘चिन्ह’चे संपादक सतीश नाईक. अतिशय स्फोटक अशा या विषयावरची ही चर्चा ऐकायला, पाहायला विसरू नका !
Related
Please login to join discussion