No products in the cart.
चित्रकार रवी परांजपे यांचं निधन !
ज्येष्ठ चित्रकार रवी परांजपे यांचं पुण्यात अल्प आजाराने निधन झालं आहे. ८७ वर्षांच्या त्यांच्या प्रवासात त्यांनी भारतीय चित्रकला क्षेत्रात मोठा मान मिळवला आहे. वास्तुकलाआरेखन, प्रकाशन, जाहिरात या क्षेत्रात देखील त्यांनी मोठी कामगिरी बजावली होती. विशेषतः वास्तुकलाआरेखनाच्या संदर्भात त्यांनी केलेले प्रयोग अतिशय नावाजले गेले.
काही महिन्यापूर्वीच चित्रकार रवी परांजपे यांना ‘बॉम्बे आर्ट सोसायटी’ने ‘रुपधर’ पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला होता. त्याचप्रमाणे ‘कम्युनिकेशन आर्टस् गिल्ड’चा ‘हॉल ऑफ फेम’ जीवन गौरव पुरस्कार देखील त्यांना मिळाला होता. ‘द ग्रीन एकोज्’ या त्यांच्या निसर्गचित्राला २०१२ साली आंतरराष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं. असे अनेक सन्मान त्यांनी त्यांच्या जीवनप्रवासात प्राप्त केले. आजच पुण्यातील खासगी रुग्णालयात त्यांचं निधन झालं. त्यांच्या आठवणींना उजाळा मिळावा यासाठी त्यांच्या वेबसाईटची लिंक सोबत देत आहोत.
Related
Please login to join discussion