No products in the cart.
एक दोन तीन चार ‘शाकम’ची पोरं ‘महा’हुशार
‘शाकम’ अर्थात शासकीय कला महाविद्यालय (सध्याचे कला व अभिकल्प ) औरंगाबाद येथे एक अद्भुत घटना घडली आहे. अद्भुत याच्यासाठी की काही टारगट पोरांनी डीनची थट्टा करण्यासाठी अतिशय खालची पातळी गाठली आहे. कॉलेजची मुलं वात्रट असतात हे मान्यच पण थेट डीनची थट्टा करणे आणि तेही इतक्या खालच्या स्तरावर जाऊन हे कला शिक्षणाच्या इतिहासात बहुदा पहिल्यांदाच घडत आहे. अर्थात औरंगाबाद कॉलेजचे डीन विद्यार्थ्यांसोबत जरा जास्तच खेळीमेळीने राहतात याची चर्चा सगळीकडे आहे (बातमीसोबतच्या फोटोत ते दिसतेच) पण अशी थट्टा भविष्यात व्हायला नको हेही तितकेच खरे.
तर झालं असं की कॉलेजच्या काही टारगट विद्यार्थ्यांनी औरंगाबाद कॉलेजच्या डीनचे अपघाती निधन झाले अशी अफवा पसरवली. झालं ती अफवा मग वाऱ्यासारखी पसरली. आज जमाना व्हाट्सअपचा आहे. कुठलीही खातरजमा न करता एका शोकाकुल विद्यार्थ्याने लगेच स्टेटस ठेवले. “You will forever be missed, our respected sir 💐💐🥢☠️ RIP ☠️ .” (आमच्या ग्रामरच्या चुका कृपया कोणी काढू नये, विद्यार्थ्याने जे स्टेटस ठेवले आहे त्यातला मजकूर इथे जसाच्या तसा कॉपी केलाय!)
झालं मग ‘चिन्हलाही असेच फोन आले की औरंगाबादच्या डीनचे अपघाती निधन. पण बातमीची शहानिशा करायचे ठरवल्यावर कळले की हा काही टारगट पोरांचा प्रताप आहे.
खरं तर शिक्षकांशी विद्यार्थ्यांचे भांडण असू शकते, पण मृत्यूसारख्या गंभीर विषयावरून एका सन्माननीय प्राध्यापकाची काय पण कुणाचीही थट्टा करणे अतिशय क्रूर आहे. संबंधित महाविद्यालय असा मूर्खपणा करणाऱ्या विद्यार्थ्यांना योग्य ती समज देईलच असे आपण गृहीत धरून चालूया . अर्थात आपली तिन्ही कला महाविद्यालयं सध्या रामभरोसेच चालतात आणि त्यात औरंगाबादची परिस्थिती तर आणखी बिकट तेव्हा समज वगैरे देण्याचा काही प्रयत्न काही होईल अशी आम्हाला बिलकुल खात्री नाही.
औरंगाबादच्या महाविद्यालयात सध्या राजकारण जोरात चालू आहे. डीन यांच्या बाजूचे आणि विरोधात असे दोन गट आहेत. यात मग विद्यार्थी आणि शिक्षक दोन्ही आले. त्यात काही महिन्यापूर्वी एका विद्यार्थिनीने औरंगाबाद कॉलेजच्या डीनवर छळाचा आरोप केला होता. दिव्य मराठी वृत्तपत्रात त्याची बातमीही आली होती. डीन महोदयांवर चौकशी कमिटी मार्फत चौकशीही सुरु होती. त्या चौकशीचा रिपोर्ट अजून आलेला नाही.
कॉलेजमध्ये जे राजकारण चालू आहे त्याचाच भाग म्हणून आजची ही दुर्दैवी थट्टा केली असू शकते. अर्थात आम्ही कुठल्याही बाजूने नाही आहोत. आम्ही फक्त कला शिक्षणाच्या बाजूने आहोत. कॉलेजशी संबंधित काहींचे असेही म्हणणे आहे की डीन कॉलेजमध्ये काही चांगले बदल करू पाहत आहेत म्हणून त्यांचा विरोधात वातावरण तापवले जात आहे. डीन जर खरंच काही चांगलं करत असतील कॉलेजसाठी तर रामभरोसे कारभार चालू असलेल्या औरंगाबाद कॉलेजला नवरात्रीच्या काळात अंबाबाईचं पावली असे आपण समजूया.
****
चिन्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करून व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
https://chat.whatsapp.com/IgdCKjB4vEsGVz68ljV34n
‘चिन्ह’चे फेसबुक पेज लाईक करा
https://www.facebook.com/chinha.art
Related
Please login to join discussion