No products in the cart.
शरद कुलकर्णी यांची एव्हरेस्ट मोहीम यशस्वी
जेजे इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाइड आर्टचे माजी विद्यार्थी शरद कुलकर्णी यांनी दि 23 मे 2023 रोजी सकाळी 10:40 वाजता एव्हरेस्ट शिखर सर केलं ही संपूर्ण चित्रकला विश्वासाठी एक आनंदाची बातमी आहे. विशेष म्हणजे शरद कुलकर्णी यांनी वयाच्या साठीनंतर एव्हरेस्ट सर केलं आहे. 2022 मध्ये शरद कुलकर्णी यांनी अंटार्टिका येथील ‘माऊंट देणाली’ हे सर्वोच्च शिखर सर केलं होतं.
या यशाचं संपूर्ण श्रेय शरद कुलकर्णी हे आपल्या दिवंगत पत्नी अंजली कुलकर्णी यांना देतात. कुलकर्णी यांच्या पत्नी अंजली यांचं अशाच एका मोहिमेवर असताना दुःखद निधन झालं होतं. कुलकर्णी आणि अंजली यांनी जगातील सात खंडातील सात सर्वोच्च शिखरे ‘सेवन समिट’ सर करण्याचं स्वप्न स्वप्न पाहिलं होतं. या स्वप्नाची पूर्तता करताना 2019 साली माउंट एव्हरेस्ट सर करीत असताना ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे तेथील 28,800 फुटावर असलेल्या हिलरी स्टॅपखाली अंजली कुलकर्णी यांचा मृत्यू झाला. त्या मानसिक धक्क्यातून सावरत कुलकर्णी यांनी उरलेली चार शिखरे सर करून आपल्या पत्नीला आदरांजली वाहण्याचे ठरविले होते. त्याप्रमाणे अकांकागुआ, माऊंट विन्सन, आणि माऊंट देनाली ही शिखरेही त्यांनी सर केली आहेत. याआधी त्यांनी नेपाळमधील माउंट लोबुचे , मेरा पीक तसेच भारतातली हनुमान तिब्बा , स्टोक कागरी इत्यादी शिखरे सर केली आहेत.
*****
Related
Please login to join discussion