No products in the cart.
‘गप्पां’मध्ये शुभा खांडेकर
शनिवार दि. १६ एप्रिल २०२२ रोजी होणारा ‘गच्चीवरील गप्पां’चा कार्यक्रम अगदी वेगळाच असणार आहे. या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत शुभा खांडेकर. इतिहास आणि पुरातत्व या विषयांच्या अभ्यासक आणि पदवीधारक असलेल्या खांडेकर यांनी अनेक इंग्रजी दैनिकातून पत्रकारिता केली. ‘अमर चित्र कथा’ या प्रख्यात चित्र मालिकेसाठी त्यांनी बराचकाळ लेखन केलं. याखेरीज ‘आर्केओगिरी’ या इंग्रजी पुस्तकाद्वारे भारतीय इतिहास आणि पुरातत्वाची शैक्षणिकदृष्ट्या महत्वाची माहिती सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्याचा भारतातला बहुदा पहिलाच यशस्वी प्रयत्न त्यांनी केला. आता त्या अमेरिकन इतिहास संशोधक आणि पुरातत्व शास्त्रज्ञ डॉ. वॉल्टर स्पिंक यांनी अजिंठा लेण्यांवरील तब्बल सहा दशकाच्या संशोधनातून साकार झालेल्या सात खंडातील माहिती आणि त्यांचं मूलगामी संशोधन सुलभ आणि संक्षिप्त स्वरूपात उतरवण्याचं काम करीत आहेत. डॉ. वॉल्टर स्पिंक यांच्यावर मराठीतून आजवर फारच थोडं लिखाण प्रसिद्ध झालं आहे. शुभा खांडेकर यांच्या सोबतच्या प्रदीर्घ गप्पांमधून डॉ. वॉल्टर स्पिंक यांच्या संशोधनाविषयीची माहिती केवळ कला वर्तुळापर्यंतच नव्हे तर सर्वसामान्य लोकांपर्यंत जावी या हेतूनं ‘चिन्ह’नं या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. या कार्यक्रमाद्वारे डॉ. वॉल्टर स्पिंक यांनी केलेल्या संशोधनातील असंख्य बारकावे उदाहरणार्थ, अजिंठा लेण्यांची निर्मिती कुठल्या कालखंडात झाली ? कुणा राजानं ती केली ? किती वर्षात ही लेणी उभी राहिली ? इत्यादी सर्वसामान्य माणसांना पडलेल्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न शुभा खांडेकर या करणार आहेत. तुम्ही जर अजिंठा लेणी पाहिली असतील तर तुम्हाला हे प्रश्न नक्कीच सतावून गेले असणार म्हणूनच हा कार्यक्रम चुकवू नका ! त्यांच्याशी गप्पा मारणार आहेत ‘चिन्ह आर्ट न्यूज’चे संपादक सतीश नाईक. शनिवार दि. १६ एप्रिल २०२२ रोजी ‘चिन्ह’च्या यु ट्यूब चॅनलवर सायंकाळी ०५.३० वाजता.
वि.सू.
या किंवा आमच्या पुढील कार्यक्रमांच्या लिंक्स आपणास हव्या असतील तर कृपया 90040 34903 या व्हॉट्सऍप नंबरवर ‘BG’ हा मेसेज पाठवा !
Related
Please login to join discussion