No products in the cart.
सोमय्या विद्यापीठाचा इमर्स 2.0 फेलोशिप प्रोग्राम
सोमय्या विद्याविहार विद्यापिठाच्या वतीने चित्रकला क्षेत्रात करिअर घडवू इच्छिणाऱ्या नवोदितांना फेलोशिप देण्यात येणार आहे. जानेवारी २०२३ मध्ये सुरु होणाऱ्या फेलोशिपसाठी देण्यात नवोदित चित्रकार आणि क्युरेटर्सकडून अर्ज मागवण्यात येत आहेत.
कार्पे आर्टे, यंग आर्ट सपोर्ट आणि शालीन वाधवाना यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबवला जाणार आहे. इमर्स 2.0 या फेलोशिप प्रोग्रामद्वारे उदयोन्मुख कलाकार आणि क्युरेटर्सना कला परिसंस्थेमध्ये संघटित आणि प्रोत्साहित करण्याचे काम केले जाते. २०१७ ते २०२२ या कालावधीत पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांसाठी ही संधी देण्यात येत आहे. यासाठी १ सप्टेंबर २०२२ पर्यंत अर्ज सादर करणे आवश्यक आहे.
अधिक माहितीसाठी Immerce 2.0 emerging Artists हा विषय नमुद करून immersefellowship@gmail.com वर संपर्क साधावा.
Related
Please login to join discussion