No products in the cart.
आपुलाची सत्कार आपणच करावा ?
सध्या जेजे स्कूल ऑफ आर्टमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमांची फारच रेलचेल सुरु आहे. डिनोव्होसारख्या महत्वाच्या कामांना केराची टोपली दाखवणारे डीन सांस्कृतिक कार्यक्रम मात्र मोठ्या धडाक्यात आणि मोठ्या बजेटमध्ये आयोजित करत आहेत. अर्थात सांस्कृतिक कार्यक्रम व्हावेतच पण एरवी टाळाटाळ करणारे डीन ही कामे मात्र धडाक्यात करत आहेत. त्याचाच एक भाग म्हणजे सृजन या ‘सृजन – एक चिंतन’ या कार्यक्रमाचे आयोजन केले गेले आहे. या कार्यक्रमात डीन साहेबांची मुलाखत आणि सत्कार असा दुहेरी सोहळा साजरा होणार आहे. म्हणजे बघा डीन साहेबानी स्वतःच स्वतःचा सत्कार घडवून आणण्याच्या कार्यक्रमावर सही केली? आता कॉलेजही आपलं, डीनही आपणच, सत्कारही आपलाच!
खरं तर अशा कार्यक्रमातून कॉलेजमध्ये शिकलेल्या किंवा इतरही कलेच्या क्षेत्रातील उत्तुंग व्यक्तिमत्त्वांना आमंत्रित करायला हवं. त्यांचं मार्गदर्शन विद्यार्थ्यांना मिळायला हवं. पण डीन मात्र नवीनच पायंडा पाडत आहेत. जेजे हे इतरही कला महाविद्यालयांसाठी आदर्श आहे. सर्व कला महाविद्यालये जेजे ला आदर्श मानून त्यांचं अनुकरण करतात. मग आता हा चुकीचा आदर्श इतर कला महाविद्यालयांच्या अधिष्ठातांनी घेतला तर जबाबदार कोण? आता तरी शिक्षण खात्याचे सचिव यात लक्ष
घालतील का?
****
**
Related
Please login to join discussion