News

‘रंगा येई वो’ मध्ये सुभाष गोंधळे

जाहिरातकर्मी आणि चित्रकार सुभाष गोंधळे यांची मुलाखत दूरदर्शन सह्याद्रीच्या ‘रंगा येई वो’ या कार्यक्रमात आयोजित करण्यात आली आहे. ही मुलाखत दि ११ फेब्रुवारी २०२३ रोजी संध्याकाळी पाच वाजता सह्याद्री वाहिनीवर पाहता येईल. या कार्यक्रमाचे प्रसारण दि १२ फेब्रुवारी २०२३ रोजी दुपारी दोन वाजताही होईल.

सुभाष गोंधळे हे जेजे इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाइड आर्टचे माजी विद्यार्थी असून ते सुगो ऍडव्हर्टायझिंगचे संचालक आहेत. गुणवत्ता आणि उत्तम काम यांच्या जोरावर प्रारंभीची काही वर्षे त्यांनी इंडियन एक्सप्रेस, टाइम्स ऑफ इंडिया, मुंबई दूरदर्शनसाठी इलस्ट्रेटर म्हणून काम केलं .त्यानंतर स्वतःची जाहिरात संस्था सुरु केली. या जाहिरात संस्थेच्या माध्यमातून काम करत असताना २०१८ साली त्यांना राष्ट्रीय उद्योगश्री पुरस्कार मिळाला आहे. महाराष्ट्र टाइम्स सारख्या वृत्तपत्रातून त्यांची देश, परदेशातील भटकंतीवरची प्रवासवर्णने आणि चित्रे प्रकाशित झाली आहेत.

लहानपणापासून त्यांनी वसईचा निसर्ग रंगवण्यास सुरुवात केली. नंतर वसईचे वाडे, मंदिरे, चर्च, किल्ला, समुद्र किनारे, डोंगर, शेती , वाडी या विषयांवर असंख्य निसर्ग चित्रे रंगवली. कोळी, आगरी, वारली जीवनशैलीवर आधारित चित्रे केली. त्या चित्रांचे ब्रिटिश कौन्सिलने मुंबईत नरिमन पॉइंट येथे भव्य प्रदर्शन भरवलं होतं. या प्रदर्शनाचं उद्घाटन, जागतिक कीर्तीचे व्यंगचित्रकार मारिओ मिरांडा यांच्या हस्ते, तसेच महाराष्ट्राचे कलासंचालक श्री बाबुराव सडवेलकर, सौ विजू सडवेलकर, ब्रिटिश उच्चायुक्त रिचर्ड हार्डविडथ आणि मुंबईतील अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले होते.

गोंधळे यांना त्यांच्या चित्रशैलीविषयी अधिक विचारले असता त्यांनी सांगितले की “चित्रकलेच्या आवडीमुळे जाहिरात संस्थेचे काम बघत असताना मी चित्रसाधना सुरु केली. सुरुवातीला माझी बहुतांश चित्रे वास्तववादी आणि निसर्गाचे चित्रण करणारी असली तरी पुढे मी अमूर्त आणि कॅलिग्राफिक शैलीत काम केले. कॅनव्हासवर अक्षरलेखन आणि अमूर्त आकार यांच्या मिलाफातून माझी चित्रे तयार होतात. सातत्याने चित्र निर्मिती करीत असताना आपोआप काहीही न ठरवता, स्वतःला पूर्ण मुक्त करून हृदयातून जे आले ते मुक्तपणे रंगवले, नंतर जे कॅनव्हास वर उमटले त्याचा मी विचार करू लागलो, माझीच चित्रे मी न्याहाळू लागलो, त्यावर विचार करता मला त्यात सूत्र सापडलं. मग त्या नुसार त्या सिरीजला मी नावे दिली, लोकांनी, जाणकारांनी, समीक्षकांनी त्याची प्रशंसा केली.”

‘रंगा येई वो’ हा कार्यक्रम सह्याद्री वाहिनीच्या यु ट्यूब चॅनलवरूनही लाईव्ह प्रक्षेपित होईल. सह्याद्री वाहिनीची यु ट्यूब लिंक पुढील प्रमाणे.

https://www.youtube.com/@DoordarshanSahyadri

Related Posts

1 of 83

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.