No products in the cart.
सुभाष वसेकर यांचे निधन
नांदेड: कलामहर्षी त्र्यंबक वसेकर चित्रकला महाविद्यालयाचे माजी प्राचार्य व बालकवी श्री.सुभाष त्र्यंबक वसेकर यांची हृदयक्रिया बंद पडल्याने दिनांक 1ऑक्टोबर 2022रोजी मध्यरात्री 12.30 वाजता त्यांच्या राहत्या घरी ‘सावली’ भाग्यनगर येथे दुःखद निधन झाले.
श्री.सुभाष वसेकर सर हे कलामहर्षी त्र्यंबक वसेकर चित्रकला महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून 2007 साली सेवानिवृत्त झाले. त्यांची विद्यार्थ्यांमध्ये शिस्तप्रिय म्हणून ओळख होती.त्यांच्या मार्गदर्शनात अनेक विद्यार्थी घडले. त्यांच्या जाण्याने कलाप्रेमी मध्ये हळहळ व्यक्त झाली आहे.
श्री.सुभाष वसेकर सर बालकवी म्हणूनही प्रसिद्ध होते. त्यांची अनेक पुस्तके प्रकाशित झाली आहेत.
त्यांच्या पश्चात पत्नी वीणा वसेकर, मुलगा पराग वसेकर (Purdue University Senior Associate) सुन वर्षा वसेकर(Mathematecian Harvard University)मुलगी पल्लवी वसेकर (Architect,Pune) बहिणी असा परिवार आहे.
मृत्यू पश्चात त्यांनी आपला संपूर्ण देह दान केला असल्याकारणाने त्यांचे कोणतेही विधी होणार नाहीत. चिन्ह आर्ट न्यूज परिवारातर्फे सुभाष वसेकर यांना श्रद्धांजली.
****
चिन्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करून व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
https://chat.whatsapp.com/IgdCKjB4vEsGVz68ljV34n
‘चिन्ह’चे फेसबुक पेज लाईक करा
https://www.facebook.com/chinha.art
Related
Please login to join discussion