No products in the cart.
उदयोन्मुख दक्षिण आशियायी कलाकार पुरस्कारासाठी नवोदितांना संधी!
द आर्टस् फॅमिली (TAF) हि लंडनस्थित दक्षिण आशियायी चित्रकारांची संस्था आहे. या संस्थेतर्फे दरवर्षी नवोदित दक्षिण आशियायी चित्रकारांना पुरस्कार दिला जातो. या पुरस्काराचा उद्देश भारत आणि शेजारील राष्ट्रातील उदयोन्मुख कलाकारांना व्यावसायिक मदत करणे तसेच त्यांच्या आंतरराष्ट्रीय करिअरसाठी लागेल ती मदत पुरवणे असा आहे.
या पुरस्कारासाठी कलाकारांनी ३१ ऑगस्ट २०२२ पर्यंत आपले अर्ज पाठवणे अपेक्षित आहे. २० निवडलेल्या कलाकारांपैकी जानेवारी २०२३ मध्ये अंतिम ३ कलाकारांची निवड केली जाईल. आपल्या कामामध्ये कौशल्य आणि नावीन्यतेचा समावेश असणाऱ्या कलाकारांची निवड केली जाईल. प्रथम पुरस्कारप्राप्त चित्रकाराला १५०० युरोचे बक्षीस मिळेल. द्वितीय पारितोषिक हे १००० युरोचे आहे तर तृतीय पारितोषिक हे ५०० युरो असेल.
सर्व कलाकारांनी या स्पर्धेत भाग घ्यावा असे आवाहन द आर्टस् फॅमिलीतर्फे करण्यात आले आहे. या स्पर्धेविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील वेबसाईटला भेट द्या.
Related
Please login to join discussion