No products in the cart.
औरंगाबाद कॉलेजला प्राध्यापक गैरहजर?
शासकीय कला महाविद्यालय, औरंगाबाद येथे कायमस्वरूपी प्राध्यापकांची संख्या बोटावर मोजण्याइतकी आहे. आणि खुद्द डीन साहेबच मनमानी वर्तन करत असल्याने बाकी प्राध्यापक किंवा कला शिक्षकांनाही अर्थातच मोकळे रान मिळाले आहे. साहजिकच संस्थेतील एक प्राध्यापक हे कॉलेजमध्ये अनुपस्थितच असतात. त्यांचा वावर कॉलेजमध्ये कमी आणि आपल्या मूळ गावी जास्त असतो. तिथे त्यांनाअसे काय महत्वाचे काम असते ‘ असा कुठला काम’गिरी’चा पर्वत त्यांना तिथे उचलायचा असतो की ज्यामुळे कॉलेजमध्ये येणे त्यांना जमत नाही हे डीन साहेबानाच माहिती.
कायमस्परूपी प्राध्यापकांचे पगार हे गगनाला भिडणारे असतात. त्याचबरोबर इतर भत्ते, हौसिंग अलाउन्स याचा उद्देश त्यांनी कुठल्याही आर्थिक अडचणीत न येता महाविद्यालयात ज्ञानदान करावे यासाठी दिले जातात. पण काही प्राध्यापक या सगळ्या सोयी सवलती तर घेतात आणि ज्ञानदान सोडून इतर सारेच्या सारे व्यवसाय करतात. काही लोक तर हौसिंग अलाउन्स वाचावा म्हणून कॉलेजमध्येच घर करून राहतात. मग अशा वेळी शासनाने त्यांना दिलेला हौसिंग अलाउन्स शासनाने परत का मागू नये ?
म्हणजे सरकारकडून फुकट भत्ते मिळवायचे, काम मात्र काडीचंही करायचं नाही हे किती दिवस चालणार? जेजेला जर या बजबजपुरी मधून बाहेर काढण्याचा सरकारचा प्लॅन आहे तर इतर दोन शासकीय कला महाविद्यालयांबरोबर दुजाभाव का? त्यांची पण योग्य ती व्यवस्था लावणे शासनाची जवाबदारी नाही का?
कला संचालनालयापर्यन्त या सगळ्या बातम्या पोचत असतात , पण कला संचालनालयाचे कुठलेही प्रभारी संचालक या सगळ्या बाबींवर योग्य ती कारवाई करण्याऐवजी भलत्याच कार्यक्रमात किंवा व्यावसायिक कामं करण्यात गुंतलेले असतात. मग या सगळ्याची जबाबदारी घेणार कोण? एकीकडे कला संचालनालय दुसरीकडे सरकार असे सर्वच जण औरंगाबाद कॉलेजच्या विद्यार्थ्यांना वाऱ्यावर सोडणार असेल तर विद्यार्थ्यांच्या भविष्याशी हा भयंकर खेळ आहे.
****
‘चिन्ह’ चे अपडेट्स मिळवण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करून व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
https://chat.whatsapp.com/C8eaBiY2CjEIqxFvJWmnUD
‘चिन्ह’ चे फेसबुक पेज लाईक करा
https://www.facebook.com/chinha.art
‘चिन्ह’चे टेलिग्राम चॅनल खालील लिंकवर क्लिक करून जॉईन करा
https://t.me/ChinhaMag
Related
Please login to join discussion