No products in the cart.
शोधनिबंध सादरीकरणाची संधी
चौथ्या टागोर आंतरराष्ट्रीय साहित्य आणि कला महोत्सवामध्ये चित्रप्रदर्शनासह अन्य वैविध्यपूर्ण उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये कलेशीसंबंधित सर्वांनाच सहभागी करून घेण्याच्या दृष्टीने विचार केला जातो. याचाच एक भाग म्हणजे या महोत्सवा दरम्यान ‘भारतीय चित्रकला, चित्र आणि चित्रण’ या विषयावरील आर्ट सेमिनारचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये कलेचे पदव्युत्तर शिक्षण घेणारे विद्यार्थी, संशोधक तसेच चित्रकलेशी सक्रीयपणे संलग्न असलेले कला समीक्षक आणि चित्रकार सहभाग घेऊ शकतात. या सेमिनारमध्ये सहभाग घेऊ इच्छिणाऱ्या व्यक्तींनी ‘भारतीय चित्रकला: चित्र आणि चित्रण या विषयावरील २००० ते ३००० शब्दांतील शोधनिबंध (वर्डफाईल) natex2022@vishwarang.com या इमेल आयडीवर १५ सप्टेंबर पर्यंत पोहोचतील अशारितीने पाठवावेत,असे आवाहन करण्यात आले आहे.
Related
Please login to join discussion