No products in the cart.
दोन महत्वाचे लेख
लोकसत्ताच्या दिनांक ११ सप्टेंबरच्या लोकरंग पुरवणीत चित्रकलेवर दोन महत्वाचे लेख प्रकाशित झाले आहेत. जे जे स्कूल ऑफ अप्लाइड आर्टचे माजी अधिष्ठाता प्रा. मं. गो. राजाध्यक्ष यांनी “कलास्वाद” सदरामधून धोंडांचे ‘रापण’ लेख लिहिला आहे. या लेखात जे. जे. स्कूल ऑफ आर्टचे माजी अधिष्ठाता प्रा. प्रल्हाद अनंत धोंड यांच्या आठवणी जागवल्या आहेत. धोंडांच्या गंमतीदार स्वभावाचे भन्नाट किस्से या लेखात वाचायला मिळतील. शिवाय सुप्रसिद्ध अशा “रापण” या आठवणींच्या संग्रहाची निर्मिती कशी झाली आणि प्रा. संभाजी कदमांनी ते पुस्तक धोंडाकडून कसे पूर्ण करून घेतले याबद्दल माहिती मिळेल. प्रा. धोंड यांची कला कारकीर्दही या लेखातून जाणून घेता येईल. हा लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा:
https://www.loksatta.com/lokrang/art-sir-j-j-of-the-school-of-art-prof-prahlad-anant-dhond-characterisation-amy-95-3121587/
याच लोकरंग पुरवणीत अरुंधती देवस्थळी यांच्या “अभिजात” सदरामधून ‘पॉल क्लेई अमूर्ततेतून संवाद’ हा अभ्यासपूर्ण लेख वाचायला मिळेल. पॉल क्लेई हे केवळ चित्रकारच नव्हते तर व्हायोलिन वादक, लेखक, संपादक आणि शिक्षकही होते. या अशा चतुरस्त्र व्यक्तिमत्वाचे पैलू या लेखामधून उलगडत जातात. बर्नच्या पॉल क्लेई या म्युझियमचे धावते वर्णन आणि तिथे असलेल्या कलाकृतींचा आढावा लेखिकेने घेतला आहे. शिवाय क्लेई यांच्या शैलीची माहितीही या लेखातून वाचायला मिळेल.
हा लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा:
https://www.loksatta.com/lokrang/bern-paul-clay-centre-einstein-paul-clay-centrum-amy-95-3121588/?utm_source=whatsapp_web&utm_medium=social&utm_campaign=socialsharebuttons
****
‘चिन्ह’चे अपडेट्स मिळवण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करून ग्रुप जॉईन करा
https://chat.whatsapp.com/J3E5Y5hTzDXEEWD4cQW2rP
‘चिन्ह’चे फेसबुक पेज लाईक करा
https://www.facebook.com/chinha.art
Related
Please login to join discussion