No products in the cart.
उघडं सत्य
ऐन दिवाळीत कडवटपणा नको म्हणून नाही लिहिलं, पण आता लिहायला काही हरकत नाही . परवाच्या रविवारी म्हणजे १२ नोव्हेम्बर रोजी सकाळीच ‘महाराष्ट्र टाइम्स’पाहून जरासा धक्काच बसला . दर्शनी जागी म्हणजे घडीच्या अगदी वर आमच्या जेजे स्कूल ऑफ आर्टचा भला थोरला फोटो छापला होता .त्या फोटोत विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या चार सुंदर तरुणी पारंपारिक मराठी साडीत दिसत होत्या . सभोवती छान रांगोळ्या वगैरे काढलेल्या , हातात पणत्या आणि आकाश कंदील वगैरे . पहिल्यांदा चमकलोच. ते आपल्या जेजेचं पोर्चच आहेना हे आधी पाहिलं . ते पहावं लागलं , कारण जेजेच्या पोर्चमध्ये कधीच तुळशी वृन्दावन कुणी बांधलं नव्हतं . जरासं निरखून पाहिल्यावर लक्षात आलं की खास दिवाळीचं फोटोसेशन करण्यासाठी ते तिथं आणलं असणार वगैरे .
पण छान , एकूण बरं वाटलं ते सारं पाहून . कारण डिनोव्हो आंदोलनाच्या काळात मटानं काहीशा नकारात्मकच बातम्या दिल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर ‘मटा’वाल्याना दिवाळीच्या फोटो सेशनसाठी का होईना जेजेची आठवण झाली हे पाहून खरंच बरं वाटलं . पण ते करताना पार्श्वभूमीवर असलेल्या आणि फोटोत दिसणाऱ्या पोर्चच्या दगडांवर थोडे पाणी शिंपडले असते किंवा पाण्याचा स्प्रे मारला असता तर त्या भिंती देखील ताज्या टवटवीत झाल्या असत्या आणि फोटो देखील अधिक खुलून आले असते . नाही का ? त्या फोटोंमुळे गेल्या दहा बारा वर्षांत जेजेच्या १६६ वर्षाच्या वास्तूची कशी हेळसांड झाली उघडं हेच सत्य समोर आलं . तुम्हाला काय वाटतं ?
Related
Please login to join discussion